शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

‘नगरपालिके’चीच १२८ वर्षांपासून वहिवाट !

By admin | Updated: January 2, 2015 00:16 IST

गडहिंग्लज नगरपालिका : ५४ वर्षांपूर्वी भाड्याने दिलेली धर्मशाळा, महसूल खाते भाडेही देत नाही अन् जागाही सोडत नाही

राम मगदूम- गडहिंग्लज -१९८७ मध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थान काळात गडहिंग्लज नगरपालिकेची स्थापना झाली. तेव्हापासून पालिका हद्दीतील सहकारी मालकीच्या जागा, इमारती व रस्ते, इत्यादी नगरपालिकेकडे रीतसर हस्तांतरित झाल्या. याच मिळकतींपैकी एक आणि गडहिंग्लज म्युन्सिपालिटी वहिवाटदार असणाऱ्या सि.स.नं. १३२६ मधील ४७३०.५ चौ. मी. जागेतील भाडोत्री धर्मशाळा इमारतीमध्ये ५४ वर्षांपूर्वी ‘प्रांतकचेरी’ सुरू झाली. आजतागायत ती याच जागेत आहे. १९५९ मध्ये गडहिंग्लज, आजरा, चंदगड व भुदरगड या तालुक्यांसाठी गडहिंग्लज येथे प्रांतकचेरी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. तत्कालीन कलेक्टरनी गडहिंग्लज म्युन्सिपालिटीच्या तत्कालीन प्रेसिडेंटना धर्मशाळेची इमारत दोन वर्षांकरिता भाड्याने देण्याची मागणी केली. जनतेच्या सोयीसाठी गडहिंग्लजमध्ये प्रांतकचेरी लवकरात लवकर सुरू व्हावी म्हणून नगरपालिकेने सर्क्युलर प्रेपोझिशनने ठराव करून ही जागा महसूल खात्याला उपलब्ध करून दिली.३१ डिसेंबर १९६० रोजी अ‍ॅडिशनल मामलेदार यांनी ताबा पावती करून नगरपालिकेकडून खुल्या जागेसह धर्मशाळा इमारत रीतसर ताब्यात घेतली. १९६१ मध्ये तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांच्या मागणीनुसार पालिकेने आपल्या उत्पन्नातून या इमारतीचा गिलावा, लाईट फिटिंग, फरशी, इत्यादी सोयी करून दिल्या. सुरूवातीला प्रांत कार्यालयाचे भाडे दरमहा १४३ रूपये इतके ठरले होते, त्याप्रमाणे ते जमा केले जात होते.१९७३ मध्ये प्रांत कार्यालयात ट्युबलाईट व फॅन बसवून दिले. इमारतीचे सिलिंग मॅसोनेट व कार्यालयीन जीपसाठी शेडही पालिकेने बांधून दिले. त्यासाठी ७ हजार रूपये खर्च केले होते. त्यामुळे दरमहा ३०० रूपये भाडे अदा करण्याची मागणी तत्कालीन नगराध्यक्षांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली होती. ठरलेले भाडेदेखील अदा होत नव्हते व थकबाकी राहत होती. त्यासंदर्भात पालिकेने प्रांतकार्यालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहारही केला आहे.सुमारे २३ वर्षांपासूनचे मार्च २०१५ पर्यंत सुमारे ४० हजार ८९८ रूपये इतके भाडे अद्याप थकित आहे. महसूल खाते भाडेही देत नाही व जागादेखील पालिककडे हस्तांतरित करीत नाही. शहराच्या मध्यवर्ती व बसस्थानकासमोरील मोक्याच्या जागेवर व्यापारी संकुल बांधून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी धडपडणाऱ्या पालिकेची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळेच या संघर्षाला नव्याने तोंड फुटले आहे.५४ वर्षांपूर्वी गडहिंग्लज नगरपालिकेकडून भाड्याने घेतलेल्या धर्मशाळा इमारतीत ‘प्रांतकचेरी’ सुरू झाली. सुमारे २३ वर्षांपासून त्याचे भाडेही थकित आहे. शहर विकास आराखड्यात दुकानगाळ्यांसाठी आरक्षित या जागेवर व्यापारी संकुल बांधण्याचे पालिकेचे नियोजन आहे. मात्र, वेळोवेळी मागणी करूनदेखील ही जागा महसूल खात्याने पालिकेकडे अद्याप हस्तांतरित केलेली नाही. आठवड्यापूर्वी सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भूमिअभिलेख खात्याने त्या जागेस वहिवाटदार म्हणून उपविभागीय अधिकारी यांचे नाव लावल्यामुळे या जागेच्या मालकीसंदर्भात प्रांतकचेरी व नगरपालिका यांच्यात नवा संघर्ष सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘प्रांतकचेरी’ची कुळकथा आजपासून..१७ जून १९५९ : धर्मशाळेची इमारत प्रांतकचेरीसाठी भाड्याने देण्याची तत्कालीन कलेक्टर यांची समक्ष मागणी.१ जुलै १९५९ : सर्क्युलर प्रेपोझिशनने जागा उपलब्ध करून देण्याचा म्युन्सिपालिटीचा निर्णय.३१ जुलै १९५९ : म्युन्सिपालिटीच्या जनरल कमिटीत ठराव क्रमांक ४६ ने विषयास मंजुरी.२३ डिसेंबर १९६० : जागेचा ताबा घेण्याबाबत तारेने प्रांताधिकाऱ्यांची मामलेदारांना सूचना.३१ डिसेंबर १९६० : अ‍ॅडिशनल मामलेदारांनी पावतीद्वारे धर्मशाळेचा ताबा घेतला.५ एप्रिल १९६१ : धर्मशाळेच्या पाठीमागील खोल्यांचा ताबा अव्वल कारकुनांनी घेतला.