शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-कोल्हापूर विमानसेवेचा सप्टेंबरपासून प्रारंभ, आॅनलाईन तिकीट विक्री सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 11:16 IST

मुंबई-कोल्हापूर विमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून ट्रू-जेट विमान कंपनीच्या माध्यमातून सुरू होणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातील पाच दिवस सेवा पुरविण्यात येणार आहे; त्यासाठी दुपारचा स्लॉट मिळाला आहे. या सेवेसाठी आॅनलाईन तिकीट विक्रीची प्रक्रिया सुुरू झाली आहे.

ठळक मुद्देमुंबई-कोल्हापूर विमानसेवेचा सप्टेंबरपासून प्रारंभ, आॅनलाईन तिकीट विक्री सुरूआठवड्यातील पाच दिवस सेवा, दुपारचा स्लॉट

कोल्हापूर : मुंबई-कोल्हापूरविमानसेवा दि. १ सप्टेंबरपासून ट्रू-जेट विमान कंपनीच्या माध्यमातून सुरू होणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार अशी आठवड्यातील पाच दिवस सेवा पुरविण्यात येणार आहे; त्यासाठी दुपारचा स्लॉट मिळाला आहे. या सेवेसाठी आॅनलाईन तिकीट विक्रीची प्रक्रिया सुुरू झाली आहे.गेल्यावर्षी ‘उडान’ योजनेंतर्गत एअर डेक्कनने कोल्हापूर-मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू केली; मात्र अनियमिततेमुळे ती काही दिवसांतच बंद पडली; त्यामुळे स्लॉटही काढून घेतले. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांत कोल्हापूरहून तिरूपती, हैदराबाद आणि बंगलोर या मार्गांवर विमानसेवा सुरू झाली. ही सेवा नियमितपणे सुरू आहे. या मार्गावरील सेवांप्रमाणेच मुंबईला सेवा सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने होत राहिली.

लोकप्रतिनिधींसह उद्योजक, व्यावसायिकांच्या संघटनांनी पाठपुरावा केला. त्याची दखल केंद्र सरकारने ‘उडान’ योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई मार्गावरील निविदा जाहीर केली. त्यात पात्र ठरल्यानुसार ट्रू-जेट कंपनीने १७ जुलैपासून शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सेवा पुरविण्यात येणार होती; पण दुपारचा स्लॉट आणि आठवड्यातील तीन दिवसच सेवा असल्याने त्यामध्ये वाढ करण्याची मागणी व्यापारी, उद्योजक, आदींनी केली.

त्यासह काही तांत्रिक अडचणींमुळे सेवा प्रारंभ लांबला. लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सेवा पुरविण्याचे दिवस आता एकूण पाच झाले आहेत. स्लॉट मात्र दुपारच्या वेळेत आहे. सेवेचे दिवस वाढल्याचा कोल्हापूरकरांना उपयोग होणार आहे.

वेळ आणि तिकीट दर असामुंबईतून दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी निघणारे विमान कोल्हापुरात २ वाजून ५ मिनिटांनी येईल. येथून २ वाजून ३० मिनिटांनी जाणारे विमान मुंबईत ३ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. ‘एटीआर’ ७२ आसनी विमानाद्वारे सेवा पुरविण्यात येणार आहे; त्यासाठी आॅनलाईन तिकीट विक्री गेल्या दोन दिवसांपासून सुरू झाली आहे.

दोन हजार २५ रुपये ते चार हजार ९०० रुपयांपर्यंत तिकीटाचा दर आहे. कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होत असल्याचा आनंद असून, ती कोल्हापूरला उपयुक्त ठरणार असल्याचे पर्यटनतज्ज्ञ व्ही. बी. वराडे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सेवेचे दिवस वाढले आहेत. या मार्गावरील सेवा दि. १ सप्टेंबरपासून सुरू होईल. सकाळच्या वेळेतील स्लॉट मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- अमल महाडिक, आमदार.

 

टॅग्स :airplaneविमानkolhapurकोल्हापूर