शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

जिल्ह्यात बहुरंगी लढती

By admin | Updated: February 14, 2017 00:52 IST

चौदा ठिकाणी तिरंगी : चार ठिकाणी दुरंगी; हजारे, जालंदर पाटील यांची ‘तलवार म्यान’

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सोमवारी तब्बल १००३ उमेदवारांनी माघार घेतली. जिल्हा परिषदेच्या ६७ जागांसाठी ३२२, तर पंचायत समितीच्या १३४ जागांसाठी ५८३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. माघारीनंतर सरूड, सातवे, आजरा, पोर्ले तर्फ ठाणे, कबनूर या पाच जिल्हा परिषद मतदारसंघांत दुरंगी, तर चौदा ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे, बाबगोंडा पाटील, शानूर मुजावर, एम. जे. पाटील, तात्या देसाई, ‘स्वाभिमानी’चे प्रा. जालंदर पाटील यांनी आपली ‘तलवार म्यान’ केली. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने गेले आठ दिवस माघारीसाठी नेत्यांना अक्षरश: कसरत करावी लागली. विविध आमिषे दाखवून अनेकांचे बंड थंड करण्यात यश आले असले तरी काही ठिकाणी बंड शमवण्यात अपयश आले आहे. सोमवारी सकाळी अकरापासून माघारीस सुरुवात झाली. शेवटच्या क्षणापर्यंत माघारीसाठी इच्छुकांची मनधरणी सुरू असल्याचे चित्र प्रत्येक तालुक्यात दिसत होते. जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक पन्हाळा तालुक्यातील ६९ जणांनी, तर पंचायत समितीसाठी राधानगरी तालुक्यातील १०७ जणांनी माघार घेतली. आजरा तालुक्यातील तीन जल्हा परिषद मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे आठ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. येथील आजरामध्ये ‘ताराराणी’चे अशोक चराटी व राष्ट्रवादीचे जयवंत शिंपी यांच्यात सरळ लढत होत आहे. चौदा मतदारसंघांत तिरंगी तर उर्वरित ठिकाणी बहुरंगी लढत होत आहे. पिशवी मतदारसंघातून बांबवडेचे सरपंच विष्णू यादव यांनी माघार घेतली. परितेमधून बाबूराव हजारे, कसबा सागावमधून बाबगोंडा पाटील, माणगावमधून एम. जे. पाटील, चंदगडमधून तात्यासाहेब देसाई, तुर्केवाडीमधून सभापती ज्योती पाटील आदी दिग्गजांनी माघार घेतली. भिलवडे भाजप पुरस्कृतयुवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व यड्रावकर गटाचे कट्टर समर्थक रावसाहेब भिलवडे यांच्या पत्नी बेबीताई भिलवडे यांनी शेवटच्या क्षणी ‘भाजप पुरस्कृत’ म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ताराराणी’चे चिन्ह प्रत्येक ठिकाणी वेगळेसोमवारी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी माघारीची प्रक्रिया झाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ३.३० वाजता चिन्हे वाटप करण्यात आली. नोंदणीकृत पक्ष असलेल्या ‘जनसुराज्य शक्ती’ला ‘नारळ’ व स्वाभिमानी पक्षाला ‘शिट्टी’ हे चिन्ह या पूर्वीच मिळाले आहे. कारण या पक्षाचे गतनिवडणुकीत ५ टक्क्यांपेक्षा जास्त सदस्य होते. त्या आधारावरच त्यांना एकसमान चिन्हे मिळाली आहेत तर ताराराणी आघाडी पक्षाला एकसमान चिन्हे मिळू शकली नाहीत. कारण या पक्षाचे गत जि. प. व पं. स. निवडणुकीत सदस्य निवडून आलेले नाहीत. त्यामुळे या आघाडीला काही ठिकाणी कपबशी तर काही ठिकाणी वेगळे चिन्ह मिळाले आहे.येथे तिरंगी लढतपिशवी , करंजफेण, भादोले, शिरोली पुलाची, उदगाव, सिद्धनेर्ली, कापशी सेनापती, पाचगांव, सडोली खालसा, सरवडे, राधानगरी, उत्तूर, कोळिंद्रे.येथे होणार सरळ लढत-आजरा - अशोक चराटी (ताराराणी) व जयवंत शिंपी (राष्ट्रवादी)सरूड - अक्षय पाटील (जनसुराज्य) व हंबीरराव पाटील (शिवसेना)पोर्ले तर्फ ठाणे - समृद्धी पाटील (जनसुराज्य) व प्रियांका पाटील (राष्ट्रवादी)कबनूर -विजया पाटील (भाजप) व कांता बडवे (आवाडे गट) लक्षवेधी झुंज :शित्तूर तर्फ वारूण - सर्जेराव पाटील-पेरिडकर व रणवीरसिंह गायकवाड.पोर्ले तर्फ ठाणे - समृद्धी पाटील व प्रियांका पाटील कोतोली - शंकर पाटील व अजित नरकेशिरोली पुलाची -शौमिका महाडिक व सुचित्रा खवरेरेंदाळ - तानाजीराव घोडेस्वार व राहुल आवाडेसिद्धनेर्ली - अमरीशसिंह घाटगे , वृषाली पाटीलबोरवडे - वीरेंद्र मंडलिक, मनोज फराकटे व भूषण पाटील परिते - राहुल पाटील व हंबीरराव पाटील आजरा - अशोक चराटी व जयवंत शिंपी माघारीसाठी घालमेलमाघारीसाठी केवळ चार तासांचा कालावधी असल्याने सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच निवडणूक कार्यालयाच्या दारात माघारीसाठी गर्दी दिसत होती. मनधरणी करून माघारीसाठी आणलेल्यांचा माघारीचा अर्ज दाखल करेपर्यंत उमेदवारांची घालमेल दिसत होती.