शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या कोल्हापुरातील साक्षीदार शंभरीत; मुक्ताबाई पाटील यांनी जागवल्या जुन्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 13:03 IST

'आज वय वर्षे १०० झाले तरी मात्र तो दिवस माझ्या स्मरणात'

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याचा आज अमृतमहोत्सवी दिवस. ७८ वर्षांपूर्वीचा तो सुवर्ण दिन अनुभवलेली पिढी आजही कोल्हापुरात आहे. अर्थात,१५ ऑगस्ट १९४७ चा हा दिवस प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेल्या मुक्ताबाई आनंदराव पाटील यांनी आज शंभरी गाठली आहे. विशेष म्हणजे त्यांची नजर आणि स्मृती अजूनही खणखणीत आहे. त्यांच्या तोंडून जुन्या आठवणी ऐकणे खरोखरच रोमांचकारी आहे.मुक्ताबाई कोल्हापुरात बेलबागेत स्वयंवर मंगल कार्यालयाजवळ आपल्या मुलाजवळ त्या राहतात. त्यांचे पती आनंदराव बळवंतराव पाटील लष्करात होते. मूळचे राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावाचे पाटील यांचा १९२३ चा जन्म. वयाच्या २२ व्या वर्षी ते ९ मार्च १९४२ मध्ये ब्रिटिश लष्करात भरती झाले. यावेळी दुसरे महायुद्ध सुरू होते. या युद्धात भरती होण्यासाठी ब्रिटिश गावोगावी प्रचार करत होते. ते काही काळ ब्रह्मदेशात होते.७ वर्षे ९ महिने सेवा करून ते १० डिसेंबर १९४९ रोजी निवृत्त झाले आणि कोल्हापुरात परत आले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे दोन्ही भाऊही भारतीय सैन्यात दाखल झाले. आता एक पुतण्या नेव्हीत आणि एक पुतण्या आर्मीत आहे. १९७८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर मुक्ताबाई यांनी मुलांना सांभाळले. तस्ते गल्लीतील लकडे-पवार हे त्यांचे माहेर. अहिल्याबाई शाळेत त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे.मुक्ताबाई सांगतात, देश स्वतंत्र झाल्याचा आनंद, म्हणून त्या १५ ऑगस्टला त्यांचे पती घरात मिठाई घेऊन आले. तहसीलदार कार्यालयाजवळ ध्वजवंदन झाले. त्यादिवशी सर्वांनी ‘भारत माता की जय’चा जयघोष केला. अनेकांनी लहान मुलांना, तेव्हा मिठाई वाटली होती. त्या दिवसाच्या माझ्या आठवणी अगदी लख्ख आहेत. माझे पती त्या दिवसाचे महत्त्व चांगले जाणून होते. त्यांनी ते सर्वांना सांगितले. येतानाच ते मिठाई घेऊन आले होते. त्यांनी घरात येताच आपला देश स्वतंत्र झाला, असे ओरडून सांगितले. सर्वांना मिठाई दिली. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. मुले भारत माता की जय.. वंदे मातरम, अशा घोषणा देत फिरत होते. आज वय वर्षे १०० झाले तरी मात्र तो दिवस माझ्या स्मरणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांना प्रत्यक्ष भेटण्याची त्यांची इच्छा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन