शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 , मुजावर पट्टी, नदीवेश नाका परिसर सीलबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 18:26 IST

कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एक संक्रमित रूग्णाकडून अन्य व्यक्तीस, इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होते. तसेच इचलकरंजी नगरपरिषद ता. हातकणंगले येथे आज पर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 झाली आहे.

ठळक मुद्देउपविभागीय दंडाधिकारी डॉ. विकास खरात यांचे आदेश

कोल्हापूर : इचलकरंजीमधील सिकंदर दर्गामागे मुजावर पट्टी, नदीवेश नाका या भागात कोरोना संसर्गित रूग्ण सापडल्याने त्याच्या राहत्या निवासस्थानापासून 300 मीटर अंतरापर्यंतच्या चारही बाजूस रस्त्यांच्या सीमा सीलबंद करून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विकास खरात यांनी आज दिले.या आदेशात म्हटले आहे, सद्यस्थितीत कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोराना विषाणूचे संसर्ग रोखण्याकरिता त्यावर प्रतिबंधात्मक उपाय-योजना आखणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एक संक्रमित रूग्णाकडून अन्य व्यक्तीस, इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होते. तसेच इचलकरंजी नगरपरिषद ता. हातकणंगले येथे आज पर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 झाली आहे. हा रुग्ण इचलकरंजी येथील सिकंदर दर्गा मागे, मुजावर पट्टी, नदीवेश नाका या भागातील आहे. या ठिकाणी त्यांच्या राहता निवासस्थानापासून 300 मीटर अंतरापर्यंतच्या चारही बाजू सीमा सिलबंद करणे आवश्यक आहे.

भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम - 1897 व जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडील दिशा निर्देशानुसार इचलकरंजी येथील नदीवेश नाका या भागातील क्षेत्र उपविभागीय दंडाधिकारी इचलकरंजी विभाग इचलकरंजी या आदेशाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत आहे व या क्षेत्राच्या चारही बाजूस सर्व रस्त्यांच्या सीमा सिलबंद करण्यात येत आहेत.

या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी खालीलप्रमाणे काटेकोरपणे पूर्तता करावी. या प्रतिबंधित क्षेत्रामधील सर्व 100 टक्के रहिवाशांचे मोबाईल आरोग्य सेतू ॲप कार्यान्वित करून घेण्यात यावे. बाधित रूग्णांच्या संपर्कातील सर्व रहिवाश्यांची यादी सविस्तरपणे तयार करावी. बाधित रूग्णांच्या संपर्कातील रहिवाशांचे होम आणि संस्थात्मक क्वॉरंटाईन बाबत वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्वरित निर्णय घेवून कार्यवाही करावी. या प्रतिबंधित क्षेत्रामधील संपूर्ण घरांचे विशेष पथकामार्फत सर्वेक्षण करून घेण्यात यावे. बाधित रूग्णांचे संपर्कातील रहिवाशांच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या तपासणी अंती विहीत केलेल्या निर्देशानुसार व्यवस्थापन करण्यात यावे.

प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाश्यांचे संपर्क माध्यमाव्दारे परिणामकारक समुपदेशन व प्रशिक्षण देण्यासाठी प्रबळ उपाययोजनांचा अवलंब करण्यात यावा. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेशास व बाहेर जाण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात यावा. तथापि, आवश्यक सेवेसाठी आत-बाहेर येणाऱ्या रहिवाशांसाठी नगरपालिकामार्फत स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात येवून नोंद वहित तपशिलवार नोंदी ठेवण्यात याव्यात. पोलीस प्रशासन तसेच इचलकरंजी नगरपरिषद यांनी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये बॅरेकेटिंग केलेल्या क्षेत्रामध्ये कडक बंदोबस्त व नियंत्रण ठेवण्यात यावे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस