शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाकीत गुडघाभर गाळ : १५ वर्षांपासून स्वच्छता नसल्याने आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:02 IST

ज्योती पाटील । पाचगाव : आर. के. नगर परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ...

ठळक मुद्देआर. के. नगरातील स्थिती

ज्योती पाटील ।पाचगाव : आर. के. नगर परिसरात कोल्हापूर महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या टाकीची स्वच्छता १५ वर्षांपासून झाली नसल्याने टाकीची सुरक्षितता व लोकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेकवेळा संबंधित प्रशासनाला लेखी तक्रारी करूनदेखील याकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष देण्याची मागणी परिसरातील रहिवाशांतून केली जात आहे.

गेल्या ४० वर्षांपूर्वी आर. के. नगर सोसायटी नं. ६ येथील महादेवनगर मंदिरानजीक पाण्याची टाकी बांधून कोल्हापूर महापालिकेकडून आर. के. नगरसह जरगनगर परिसराला पाणीपुरवठा केला जातो; परंतु या टाकीच्या स्वच्छतेकडे महापालिकेने पुरते दुर्लक्ष केले असल्याने या टाकीत गुडघाभर गाळ साचून राहिला आहे. तसेच टाकीला टोपण नसल्याने टाकीत बाटल्या व अन्य साहित्य पाहावयास मिळते. टाकीच्या सभोवती भेगा पडल्याने टाकीची सुरक्षितता धोक्यात आली आहे, तसेच टाकीत साचलेल्या गाळामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकवेळा महापालिका प्रशासनाकडे व कर्मचाऱ्यांकडे स्वच्छतेसाठी विनंती केली असूनसुद्धा त्यांनी दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे टाकीचे बांधकाम ठिसूळ होऊन टाकी असुरक्षित बनली आहे.

या टाकीशेजारी मोकळी जागा असल्याने या ठिकाणी लहान मुले खेळत असतात. अशावेळी टाकीचे ढपलेदेखील पडतात. त्यामुळे मुलांचे खेळणेदेखील धोकादायक बनले आहे तसेच टाकीच्या ठिकठिकाणी लोखंडी सळ्या उघड्या पडू लागल्या आहेत तरीदेखील पर्यायी व्यवस्था नसल्याने याच टाकीतून पाणीपुरवठा केला जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन स्वच्छता करावी व डागडुजी करावी, अशी मागणी आर. के. नगर परिसर व भागातील नागरिकांतून केली जात आहे. 

 

अनेकवेळा महापालिकेक डे तक्रारी करूनदेखील अद्याप आर. के. नगरमधील पाण्याच्या टाकीची स्वच्छता केली नसल्याने टाकीची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी टाकीला भेगा पडल्याने त्याची डागडुजी व स्वच्छता लवकरात लवकर करणे गरजेचे आहे. याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहेत.- संग्राम पोवाळकर, उपसरपंच पाचगाव.आर. के. नगर परिसराला महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी ज्या टाकीत पाणी साठवले जाते. ती टाकी अनेक वर्षे स्वच्छ न केल्याने दुर्गंधीयुक्त पाणी लोकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. या टाकीची स्वच्छता लवकरात लवकर करावी.- प्रवीण कुंभार,ग्रा. पं. सदस्य, पाचगाव.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरwater pollutionजल प्रदूषण