शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा खांब अंगावर कोसळून महावितरणच्या लाईनमनचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 21:11 IST

accident, mahavitran, kolhapurnews वायरिंग बदलण्याचे काम सुरू असताना तोच सिमेंटचा विजेचा खांब मोडून अंगावर पडल्याने महावितरणच्या लाईनमनचा मृत्यू झाल्याची दुर्घटना बुधवारी सायंकाळी जाधववाडीपैकी भोसलेवाडी येथे घडली. प्रकाश आनंदा भोसले (वय ३२, रा. उचत, ता. शाहूवाडी) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुराच्या पाण्यात हा सिमेंटचा खांब जीर्ण झाल्याने ही दुर्घटना घडली.

ठळक मुद्देविजेचा खांब अंगावर कोसळून महावितरणच्या लाईनमनचा मृत्यू भोसलेवाडीतील दुर्घटना : पुराच्या पाण्याने जीर्ण झालेला खांब मोडला

कोल्हापूर : वायरिंग बदलण्याचे काम सुरू असताना तोच सिमेंटचा विजेचा खांब मोडून अंगावर पडल्याने महावितरणच्या लाईनमनचा मृत्यू झाल्याची दुर्घटना बुधवारी सायंकाळी जाधववाडीपैकी भोसलेवाडी येथे घडली. प्रकाश आनंदा भोसले (वय ३२, रा. उचत, ता. शाहूवाडी) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुराच्या पाण्यात हा सिमेंटचा खांब जीर्ण झाल्याने ही दुर्घटना घडली.पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, प्रकाश भोसले हे महावितरणमध्ये लाईनमन आहेत. गेल्या वर्षभरापूर्वी त्यांची उचतहून कोल्हापूरला बदली झाली होती. जाधववाडीपैकी भोसलेवाडी परिसरात पुराच्या पाण्यामुळे जमीन भुसभुसीत होऊन अनेक विजेचे खांब वाकल्याने परिसरात विजेचा वारंवार व्यत्याय येत होता. गेले दोन दिवस या परिसरात विजेचे खांब सुस्थितीत करण्याचे काम सुरू आहे.

बुधवारी सायंकाळी एका सिमेंटच्या जीर्ण झालेला खांबावरील वायरिंग ओढून ते सुस्थितीत करण्याचे काम सुुरू होते. यासाठी प्रकाश भोसले हा लाईनमन खांबावर चढून वायरिंगचे काम करत होता. याचवेळी हा जीर्ण विजेचा खांब जमिनीतूनच मोडल्याने तो खांबासह खाली कोसळला. या खांबाखाली सापडल्याने प्रकाश गंभीर जखमी झाले. त्यांना तेथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात आणले; पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, आई, चार मुली असा परिवार आहे. चार महिन्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरात महावितरणचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांच्या मृतदेहाचे रात्री उशिरा सीपीआर रुग्णालयात विच्छेदन करून तो नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.लाईनमनकडून खांबावर वायरिंग दुरुस्तीचे काम?खांबावर चढून वायरिंग दुरुस्तीचे काम करण्याची जबाबदारी ही महावितरणच्या वायरमनची असते. पण प्रकाश भोसले हे लाईनमन असताना त्यांना खांबावर चढून वायरिंग दुरुस्तीचे काम कसे लावले? अशी चर्चा महावितरणच्या कर्मचाऱ्यांत सुरू होती.

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यूkolhapurकोल्हापूर