शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

..हे तर जिल्ह्याचे नवे अदानी-अंबानी, कोल्हापुरातील दोन्ही मंत्र्यांवर खासदार मंडलिकांची बोचरी टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 18:55 IST

ते आपल्या सत्तेचा संबंध आला तर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी भूमिका घेतात. सत्तेच्या आणि पैशाच्या माध्यमातून सर्व सूरु आहे.

कोल्हापूर : देशावर अदानी आणि अंबानी राज्य करतात आणि जिल्ह्यात दोन नवे अदानी अंबानी सर्व सत्ता आपल्याकडेच राहील यासाठी झटत आहेत, त्यांच्यापासून सावध राहा अशी बोचरी टीका खासदार संजय मंडलिक यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता केली. गेली सहा वर्षे स्वच्छ कारभार आहे तर शपथा, टोकण कशाला, सरळपणे निवडून येऊन दाखवा असे आव्हानही त्यांनी दिले.

ते आपल्या सत्तेचा संबंध आला तर वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी भूमिका घेतात. सत्तेच्या आणि पैशाच्या माध्यमातून सर्व सूरु आहे. जमलं नाही तर आपल्या पध्दतीने वेगळी मोट बांधतात, हे समजण्याइतका मतदार आता दूधखुळा राहिलेला नाही असा इशाराही मंडलीक यांनी यावेळी दिला.जिल्हा बॅंकेतील शिवसेना प्रणित शाहू परिवर्तन विकास या विरोधी आघाडीचा करवीर, पन्हाळा, गगनबावडा, कोल्हापूर शहर यांचा संयुक्त प्रचार मेळावा कळंबा येथील अमृतसिध्दी हॉलमध्ये झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार होते. माजी आमदार चंद्रकांत नरके यांनी या मेळाव्याचे संयोजन केले होते.कोल्हापूर जिल्हा बँकेत शिवसेना आणि सत्तारूढ गट अशी दुरंगी लढत होत आहे. जागा वाटपात तडजोड न झाल्याने महाविकास आघाडीतून बाहेर पडत शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. अन् निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेना पुर्ण विराम मिळाला. यानंतर दोन्ही आघाडीच्या प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. या प्रचारसभेतून आता नेत्यांनी एकमेकांवर टिकास्त्र सोडण्यास सुरुवात केली आहे. मंडलिक म्हणाले, बॅंक एकट्या कुणामुळे फायद्यात आली नाही, त्याला सर्वांचा हातभार लागला. मुश्रीफांनी एकमुखी कारभार केला, पण त्यांना बळ देणाऱ्यात आम्हीही होतो, याचा त्यांना विसर पडल्याची खंत आहे. पक्षीय जोडे बाजूला ठेवले असे सांगता, मग जिल्हा परिषद, गोकूळला का तसे केले नाही. जोडे बाजूला ठेवण्याच्या नादात बॅंकेतून बाहेर येताना भाजपचे जोडे घालून येणार का असा तिखट सवालही मंडलीक यांनी केला.यावेळी अध्यक्षस्थानावर बोलताना माजी आमदार संपतराव पवार यांनी सत्ताधाऱ्यावर टिका केली. तर माजी आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबीटकर, माजी आमदार सत्यजित पाटील, सुजित मिणचेकर, पी.जी.शिंदे, शहाजी कांबळे, बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकूळ संचालक अजित नरके, एस.आर.पाटील, विजय देवणे, शुभांगी पोवार, अशोक पवार पाटील, बाबासो देवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbankबँकElectionनिवडणूकSanjay Mandalikसंजय मंडलिकHasan Mushrifहसन मुश्रीफSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील