शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

मटका-सेक्स रॅकेटची चलती

By admin | Updated: July 11, 2016 01:08 IST

शहरात राजरोस अवैध धंदे : पोलिस करतात काय? यंत्रणा चालली हाताबाहेर

एकनाथ पाटील ल्ल कोल्हापूर भ्रष्ट यंत्रणेची साखळी बनते, तेव्हा नियमांना कचऱ्याची टोपली दाखवून गैरकारभार, लुटालूट सुरू राहते. अजूनही पोलिस खात्यातील काहीजण चुकांवर पांघरूण घालून त्या बदल्यात मिळालेली मलई खात आहेत. मटका, जुगार, हातभट्टी यांसारखे अवैध धंदे राजरोस सुरू आहेत. वर्दीतले पोलिस नेमके करतात काय? असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत. कोल्हापूरसारख्या शहरात थेट पश्चिम बंगालहून होणारी अवैध मानवी वाहतूक ही गंभीर बाब आहे. गरिबीमुळे ‘लैंगिक गुलामगिरी’ला बळी पडणाऱ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी कीड या शहरातही पाय पसरू लागली आहे. दरडोई आर्थिक उत्पन्नात राज्यात आघाडीवर असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय जोमाने सुरू आहे. या ठिकाणी सेक्स रॅकेट, मटका व जुगारातून आर्थिक उलाढाल कोटींवर होते. त्यामुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस फोफावत आहे. पंचगंगा नदीघाट परिसरात झालेल्या पश्चिम बंगालमधील युवतीच्या खून प्रकरणामुळे अवैध मानवी वाहतुकीचे रॅकेट पुढे आले. कोल्हापुरातील काही दलाल बांगलादेशी आणि पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागातून चोरटी मानवी वाहतूक करीत आहेत. शहरात उच्चभ्रू वसाहतींमध्ये हायफाय वेश्या व्यवसाय राजरोस सुरू आहे. पोलिस मुख्यालयात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत शहरात मटका-जुगारसह अन्य अवैध धंदे सुरू नसल्याचे पाचही पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांनी पंधरा दिवसांपूर्वी सांगितले. त्यानंतर याच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सेक्स रॅकेट, मटका, जुगार अड्ड्यावर शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने छापे टाकले. मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून घरबसल्या पानटपरी, गल्ली-बोळांत मटका घेतला जातो. शहरात २८ पेक्षा जास्त क्लब आहेत. करमणुकीच्या नावाखाली तेथे जुगार जोमात सुरू आहे. पोलिस यंत्रणेतील एक वर्ग छुप्या मार्गाने हप्ते गोळा करीत असल्याने ‘क्लब’च्या नावाखाली जुगार जोमात सुरू आहे. काही क्लबमध्ये तर पोलिसांची भागीदारी आहे. मोरेवाडी, राजेंद्रनगर, सरनोबतवाडी, शिंगणापूर पाण्याची टाकी, येथील गावठी हातभट्ट्यांवर दरवर्षी पोलिस छापे टाकून अड्डे उद्ध्वस्त करतात. पुन्हा या हातभट्ट्या जोमाने सुरू होतात, त्या पोलिसांच्या आशीर्वादानेच. हाताबाहेर गेलेल्या पोलिस यंत्रणेला रोखणार कोण? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे. ‘सफारी कलेक्टर’ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी व करवीर पोलिस ठाण्यांत ‘सफारी कलेक्टर’ कार्यरत आहेत. हे कलेक्टर पोलिसांच्या अवतीभोवतीच असतात. त्यांना कुठली ड्यूटी किंवा जबाबदारी नाही. त्यांनी फक्त ‘वसुली’ करायची हीच त्यांची ड्यूटी! साहेबांची मर्जी सांभाळत मटका, क्लबवाल्यांकडून महिन्याला २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत हप्ते गोळा करणारे कलेक्टर दिसत नाहीत का? ठाण्याच्या हद्दीत सुरू असणारा मटका-जुगार ४जुना राजवाडा : मंगळवार पेठ दूधकट्टा, उभा मारुती चौक, गांधी मैदान, रंकाळ स्टॅँडमागे, साकोली कॉर्नर, रंकाळा उद्यान, फुलेवाडी पहिला स्टॉप, क्रशर चौक, संभाजीनगर, पाण्याचा खजिना, वारे वसाहत, हॉकी स्टेडियम. ४लक्ष्मीपुरी : गंगावेश येथील अर्बन बँकेच्या पिछाडीस, पंचगंगा तालीम, तोरस्कर चौक, टाउन हॉल, करवीर पंचायत समितीचा परिसर, सीपीआर, तहसील कार्यालय, शिवाजी चौक मार्केट, पद्मा चौक, धान्य व्यापार लाईन, मटण-मार्केट रोड, फुलेवाडी पहिला स्टॉप, खानसरी, लक्षतीर्थ वसाहत. ४शाहूपुरी : रेल्वे स्टेशनसमोरील रिक्षा स्टॉप, मध्यवर्ती बसस्थानक, परिख पूल, बागल चौक, विचारेमाळ, सदर बझार, कावळा नाका, कनाननगर, कदमवाडी, जाधववाडी, मार्केट यार्ड, महावीर कॉलेज परिसर, विवेकानंद कॉलेजसमोर, प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसर, कसबा बावडा, भगवा चौक, पोस्ट कार्यालय. ४राजारामपुरी : राजारामपुरी मेन रोड, सायबर चौक, माउली पुतळा, यादवनगर, जवाहरनगर, राजेंद्रनगर, शाहू मिल. ४करवीर : पाचगाव, आर. के.नगर, मोरेवाडी, कळंबा, वाशी नाका, पुईखडी, आंबेवाडी फाटा, वडणगे, केर्ली, बालिंगा, कुडित्रे-सांगरूळ फाटा, सांगरूळ बाजारवाडा, कसबा बीड, इस्पुर्ली फाटा. फक्त रुबाब... गुन्हे शाखेचे (डीबी) पथक म्हणजे फक्त रुबाब. रेकॉर्डवरील आरोपींना पकडण्यापलीकडे आव्हानात्मक गुन्हा त्यांच्याकडून अद्याप उघडकीस आलेला नाही. हद्दीतील राजकीय गुन्हेगारांच्या अवतीभोवती मिरविणे, चौकातील पानटपरीवर फुकटचे पान खाणे, ठरलेल्या लॉज-हॉटेलमध्ये दोन-दोन तास विश्रांती अशा पद्धतीचे उपद्व्याप करण्यामध्येच ते प्रसिद्ध आहेत.