शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: ‘मेन राजाराम’ हलविण्याच्या हालचालींना वेग, पालकमंत्र्यांच्या मनांतील डाव कळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 19:20 IST

पालकमंत्री केसरकर यांनी गेल्या आठवड्यात ‘मेन राजाराम’ प्रशालेची पाहणी केली. किती विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना कोणत्या सोयी, सुविधा आहेत, या सुविधा देताना जुनी हेरिटेज इमारत म्हणून काही अडचणी येतात का याचीही त्यांनी माहिती घेतली.

कोल्हापूर :‘मेन राजाराम’ हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय बंद होणार नसले तरी ते हलविण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. एकीकडे महापालिकेच्या नऊ शाळांची पाहणी केल्यानंतर आता शहरात माध्यमिक शाळांसाठी आरक्षित असलेल्या जागांचाही शोध सुरू आहे. याची वाच्यता न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नूतन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मनात नेमका काय डाव आहे अशी विचारणा होत आहे.केसरकर यांनी गेल्या आठवड्यात ‘मेन राजाराम’ प्रशालेची पाहणी केली. किती विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना कोणत्या सोयी, सुविधा आहेत, या सुविधा देताना जुनी हेरिटेज इमारत म्हणून काही अडचणी येतात का याचीही त्यांनी माहिती घेतली. यानंतर त्यांच्या या पाहणीच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित केल्यानंतर त्यांनी याबाबत गुरुवारी पत्रकार परिषदेत खुलासाही केला.

परंतु या खुलाशामध्येच केसरकर यांनी ‘मेन राजाराम’साठी पर्यायी जागा शोध असल्याचे सांगून ही प्रशाला येथून हलवून त्या ठिकाणी अन्य पर्यायी प्रकल्प उभारला जाण्याची शक्यता व्यक्त केली. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या नऊ शाळांची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. यातील तीन शाळा सुधारण्यापलीकडे असून, काही शाळांना पुरेसे मैदान नाही. म्हणून आता शहरातील माध्यमिक शाळांसाठीच्या आरक्षणाच्या जागा पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार या जागांचीही पाहणी करण्यात आली असून, या सर्व प्रकरणी पर्यायी जागांचा अहवाल उद्या, सोमवारी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांना सादर केला जाण्याची शक्यता आहे.

या आरक्षित जागांची पाहणीमाध्यमिक शाळेसाठी आरक्षित अशी पाऊण एकराची जागा रंकाळ्यामागे आहे. राधानगरी रोडवर चिव्याचा बाजार या ठिकाणी आठ एकरांहून अधिक जागा आरक्षित आहे. उत्तरेश्वर पेठ येथेही जागा असून, तेथे मात्र पुराच्या काळात पाणी येते. या तीन जागांची पाहणी करण्यात आल्याचे समजते.

प्रकरण गंभीर वळण घेण्याची शक्यता ‘मेन राजाराम’चे भवानी मंडपातून स्थलांतर माजी विद्यार्थ्यांसह अनेक संघटनांना मान्य नसून यातील काही संघटनांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे. माजी विद्यार्थीही याला विरोध करण्यासाठी एकत्र येणार असून, हे प्रकरण गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर