शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीत जलकुंभाच्या उभारणीसाठी सेनेचे शोले स्टाईलने आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 22:38 IST

हुपरी : हुपरी (ता.हातकणंगले )शहरांतील माळभागावरील चार उपनगरांना पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी वसाहतीतील खुल्या जागेमध्येच जलकुंभ उभारण्यात यावा. या मागणीसाठी शहर शिवसेनेने आज नगरपरिषद कार्यालयानजीकच्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. ही मागणी नगरपरिषद प्रशासनाने मान्य न केल्याने हुपरी शहर बंद पुकारुन जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ...

हुपरी : हुपरी (ता.हातकणंगले )शहरांतील माळभागावरील चार उपनगरांना पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी वसाहतीतील खुल्या जागेमध्येच जलकुंभ उभारण्यात यावा. या मागणीसाठी शहर शिवसेनेने आज नगरपरिषद कार्यालयानजीकच्या जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. ही मागणी नगरपरिषद प्रशासनाने मान्य न केल्याने हुपरी शहर बंद पुकारुन जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी नगरपरिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान काळंम्मावाडी वसाहतीतील जागा संपादित करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे लेखी आश्वासन नगरपरिषद प्रशासनाने दिल्यानंतर दुपार नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

नऊ वर्षांपूर्वी तत्कालीन ग्रामपंचायत काळात मंजूर झालेली नळपाणी योजना अद्यापही दुसऱ्या टप्पा पूर्ण होण्याच्या प्रतिक्षेत आहे. योजनेच्या आराखड्यात शहरांतील विविध चार भागात जलकुंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी तिन जलकुंभ बांधून तयार आहेत.मात्र माळभागावरील चार वसाहतीना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असणारा काळम्मावाडी वसाहतीतील नियोजित जलकुंभ अद्याप पर्यंत उभारण्यात आलेला नाही. या जागेवर जलकुंभ उभारण्यास येथील नागरिकांनी विरोध केल्यामुळे गेली सात वर्षे हा जलकुंभ उभारण्यात आलेला नाही. या जलकुंभाची उभारणी त्वरीत करण्यात यावी अंशी मागणी करीत शिवसेना शहर प्रमुख अमोल देशपांडे ,विभाग प्रमुख विनायक वीभुते , संजय पाटील रघुनाथ नलवडे भरत मेथे गणेश कोळी अरुण गायकवाड नितीन काकडे अर्जुन जाधव तुळशीराम गजरे महेश कोरवी रणजित वाइगडे उषा चौगुले मीना जाधव सागर खोत विजय जाधव सचिन यादव यांनी अण्णाभाऊ साठे चौकातील जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले.

या आंदोलनांची दखल घेत उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे अमित गाठ यांनी आंदोलकाशी चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली याबाबत नगरपरिषद कोणतीही ठोस भूमिका घेत नाही.असे समजताच जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी हुपरी शहर बंद पुकारुन ठिया आंदोलन सुरू केले.शिवसैनिक शहरात फिरून बंद च्या घोषणा देत असल्याने व्यापा?्यांनी आपली दुकाने पटापट बंद केलीं .शहराकडे येणारी सर्व वाहतूक बंद झली त्यामुळे विविध प्रकारच्या अफवा पसरल्याने शहरांतील तणावात भरच़ पडली. यावेळी जादा पोलिस बंदोबस्त पाचारण करण्यात आला होता.

हुपरी शहरांतील चार वसाहतीना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक असणाºया जलकुंभाची तातडीने उभारणी करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेने जलकुंभावर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. २)या मागणीच्या पूर्ततेसाठी नगरपरिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केले, ३)यावेळी शहरांत बंदही पुकारण्यात आला होता. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक