शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जुना बुधवार पेठ येथील वृक्षाचे पुनर्लागवड करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 11:28 IST

जुना बुधवार पेठ येथे पोलीस निवासस्थानाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी असणारी वृक्ष तोडण्यास परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. असे असतानाही महापालिकेने येथील वृक्षाचे पुनर्लागवड करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वृक्षावर हरकती दाखल करण्यासंदर्भात नोटीस लावली आहे.

ठळक मुद्देजुना बुधवार पेठ येथील वृक्षाचे पुनर्लागवड करण्याच्या हालचाली महापालिकेचा पुन्हा सावळा गोंधळ

कोल्हापूर : जुना बुधवार पेठ येथे पोलीस निवासस्थानाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी असणारी वृक्ष तोडण्यास परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. असे असतानाही महापालिकेने येथील वृक्षाचे पुनर्लागवड करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वृक्षावर हरकती दाखल करण्यासंदर्भात नोटीस लावली आहे.

विशेष म्हणजे २३ तारखेची नोटीस २८ डिसेंबरला वृक्षावर लावण्यात आली असून, सात दिवसांत हरकती दाखल करण्याचे यामध्ये म्हटले आहे. कोणी हरकती दाखल करू नये; यासाठी प्रशासनाने असा प्रकार केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून होत आहे.जुना बुधवार पेठ येथील पोलिसांसाठी घरे बांधण्याचा प्रकल्प सुरू आहे. बांधकामाला अडथळा ठरत असल्यावरून ८0 वर्षांपूर्वीची दोन अशोकाची वृक्ष तोडण्याच्या हालचाली सुरू आहेत. परिसरातील नागरिकांनी यासाठी दोन वेळ आंदोलन केले. गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर या बांधकामाला स्थगिती दिली; परंतु बांधकामासाठी वृक्षाभोवतीने खुदाई केली आहे.

यामुळे वृक्ष कमकुवत झाले असून, एका बाजूला झुकले आहेत. एकीकडे ही स्थिती असताना महापालिकेच्या उद्यान विभागाने वृक्षावर नोटीस लावली आहे. यामध्ये वृक्ष पूनर्लागवड करण्यात येणार असून, यासंदर्भात हरकती देण्याचे म्हटले आहे. मुळात संबंधित वृक्ष तोडूच नयेत, अशी मागणी नागरिकांची आहे. वृक्ष सोडून बांधकामास भरपूर जागा आहे. वृक्ष तोडलेच पाहिजेत, असे नाही. तसेच इतक्या मोठ्या वृक्षांची पूनर्लागवड करण्याची यंत्रणा महापालिकेकडे आहे काय? असा सवाल केला जात आहे.परिसर पत्र्याने बंद, नागरिक नोटीस कशी पाहणारवृक्षाचा संपूर्ण परिसर पत्र्याने बंद केला आहे. जेथून आत जावयाचे त्या दरवाजाला कुलूप असून, कोणालाही येथे प्रवेश करता येणार नाही, असा फलक लावला आहे. आतच जाता आले नाही, तर नागरिक नोटीस कशी पाहणार आणि हरकत कशी देणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

सात वृक्षांपैकी पाच वृक्षांची या परिसरातच पुनर्लागवड करण्यात येणार आहे. मुळांची आणि फांद्यांची छाटणी केली जाणार आहे. अशा प्रकारे कोटीतीर्थ येथे ५0 फुटांचे वृक्षाचे महापालिकेने पुनर्लागवड केली आहे. तसेच नोटीस २८ नव्हे तर २३ रोजीच लावली आहे.अनिकेत जाधव, उद्यान अधीक्षक

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर