शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

मोरयाऽऽचा गजर; डॉल्बीच्या कानठळ्या शहरात ‘श्रीं’चे जल्लोषात आगमन; घराघरांत धार्मिक व मांगल्याचे वातावरण;

By admin | Updated: August 30, 2014 00:25 IST

रात्री उशिरापर्यंत मंडळांच्या मिरवणुका

कोल्हापूर : ओम अनादि आद्या वेद वेदान्त विद्या वंद्य ही परमा... वंद्या स्वयंवेद्या श्री गणेश... प्रथमपूज्य दैवत, विद्येचा दाता... सुखकर्ता, दु:खहर्ता... विघ्नविनाशक, ऐश्वर्य व समृद्धीचे दैवत असलेल्या भक्तांच्या लाडक्या गणरायाचे पारंपरिक व भक्तिमय वातावरणात घरोघरी आगमन झाले. तर झांजपथक, ढोल-ताशे, लेझीम-बरोबरच डॉल्बीचा दणदणाट, डोळे दीपविणारे लाईट इफेक्टस व फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक तरुण मंडळाच्या गणेशमूर्ती विसावल्या. रात्री सातनंतर अनेक मंडळांनी रंगीत व डोळे दीपवणारी एलईडी व शार्पी पद्धतीच्या विद्युत रोषणाईने मिरवणूक उजळून टाकली होती. डॉल्बी साऊंड सिस्टीमवर गणेश आरतीपासून ‘लुंगी डान्स... ’, ‘आता माझी सटकली...’ गाण्यांचा हंगामा सुरू होता. दारात सप्तरंगी रांगोळीचा गालिचा, पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, बाप्पांना बसायला मखमली गालिचा आणि भोवती सजवलेला सुरेख मंडप... पंचामृत, धूप-दीप नैवेद्य आणि आरतीने घरात पसरलेले चैतन्य... खीर-मोदकांचा नैवेद्य आणि ‘गणपती बाप्पा मोरया...’ ‘मंगलमूर्ती मोरया... ’अशा मंगलमयी आणि धार्मिक वातावरणात भक्तांचा पाहुणा म्हणून आलेल्या गणरायाचे घराघरात स्वागत झाले. शहरातील शाहूपुरी, पापाची तिकटी, गंगावेश, बापट कॅम्प आदींसह उपनगरातील गणेशमूर्ती विक्री ठिकाणी गर्दी झाली होती. फरची टोपी, सलवार कुर्ता घातलेले पुरुष मंडळी, काठाच्या साडी नेसलेल्या महिला-मुली असा सहकुटूंब सहपरिवार बाप्पाला आपल्या घरी नेण्यासाठी आले होते. काहींनी चालत तर काहींनी दुचाकी, चारचाकीतून, अगदी रथातून मिरवणूक काढून बाप्पांचा स्वागतसोहळा हर्षोल्हासाने साजरा केला. एकाच भागातील जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी हातगाडी सुरेख सजवून त्यातून मूर्तींची मिरवणूक काढली. दुपारी चारनंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरून अनेक तालीम मंडळांनी आपल्या मिरवणुका काढल्या. त्यामध्ये डायमंड स्पोर्टस् क्लब, गोल्डस्टार मित्र मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, शिवाजी तरुण मंडळ, राजारामपुरी, मदनलाल धिंग्रा तरुण मंडळ, उद्यमनगर फ्रेंडस सर्कल, बालावधूत मित्र मंडळ, जय शिवराय तरुण मंडळ, साठमारी फ्रेंडस सर्कल, तुकाराम माळी तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, वेताळमाळ तालीम मंडळ, जयशिवराय मित्र मंडळ, बुवा चौक, पद्माराजे स्पोर्टस्, बालगोपाल तालीम मंडळ, चॅम्पियन तरुण मंडळ, राज तरुण मंडळ, न्यू महाद्वार रोड, राजाराम चौक तरुण मंडळ, त्रिमूर्ती गमेश मंडळ, टायगर मित्रमंडळ, उमा प्ले कॉर्नर, सिद्धीविनायक तरुण मंडळ, छत्रपती शहाजी तरुण मंडळ, रमणमळा, स्वराज्य समूह, हिंदवी गु्रप आदी मंडळांचा समावेश होता. रोषणाई व वाद्यांच्या ठेक्यावर जल्लोषात रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. सोशल मीडियावर ‘बाप्पा’ लाडक्या गणरायाचे स्वागत, आगमन अशा विविध क्षणांची अनेकांनी व्हॉट्स अ‍ॅप, हाईक आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून छायाचित्रे, व्हिडीओद्वारे देवाणघेवाण केली. व्हॉट्स अ‍ॅपवरील अनेक ग्रुपनी आज ‘बाप्पा स्पेशल डे’ साजरा केला. यात संबंधित ग्रुपमधील सदस्य आपापल्या घरातील गणेशमूर्तींची छायाचित्रे अपलोड करीत होते. दिवसभर गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचा सोशल मीडियावर वर्षाव सुरू होता. युवती, महिलांची आघाडी कुंभारवाड्यातून गणेशमूर्ती घेऊन जाण्याची आणि घरी नेल्यानंतर या मूर्तीची प्रतिष्ठापना पुरुषांनी करावी, अशी परंपरा आहे; पण आता हे चित्र बदलले आहे. आज स्त्री-पुरुष समानतेचे पाऊल उचलत, कुटुंबीयांसोबत आलेल्या कित्येक युवती, महिलांनी कुंभारवाड्यातून गणेशमूर्ती घेत, जयजयकार करीत त्या घरी नेल्या. गणरायाच्या आगमनाच्या जल्लोषातदेखील अनेकजणी सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वाद्यांचा दणदणाट शहरातील विविध कुटुंबांकडून वैयक्तिकरीत्या तसेच गल्ली, कॉलनी, अपार्टमेंटमधील चार ते पाच कुटुंबांनी एकत्रितपणे हलगी-घुमकं, ढोल-ताशे, बेंजो, लेझीम पथक अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीद्वारे गणेशमूर्ती घरात नेल्या. दुपारपर्यंत हे चित्र कुंभारवाड्यात दिसून येत होते. वरुणराजाचीही मानवंदना गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने आजदेखील आपली हजेरी लावून जणू गणरायाला मानवंदना दिली. रात्रभर पडत असलेला पाऊस सकाळी सातच्या दरम्यान थांबल्याने भाविकांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर दुपारी दीडच्या दरम्यान पुन्हा जोरदार आलेल्या पावसाच्या सरींनी गणेशमूर्ती नेण्यासाठी आलेल्या भाविकांची धावपळ झाली. सामूहिक आगमन गणेशमूर्ती नेण्यासाठी अनेकजण आपल्या कुटुंबीयांसमवेत येत होते. काही कुटुंबे एकत्रितपणे गणेशमूर्ती वाद्यांच्या गजरात नेत होती. कॉलनी, गल्लीतील नागरिक ढकलगाडी, हातगाडी आकर्षकपणे सजवून त्यात गणेशमूर्ती ठेवून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने ती घरी घेऊन जात होते. काहींनी या गाड्यांना ध्वनिक्षेपकदेखील लावले होते.