शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष अन् बेफिकिरीच नडते..!, सदोष रस्तेही अपघातांचे मुख्य कारण 

By उद्धव गोडसे | Updated: May 11, 2024 12:13 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट..जाणून घ्या

उध्दव गोडसेकोल्हापूर : वाहनधारकांच्या चुकांमुळेच बहुतांश अपघात होतात. सुरक्षा साधनांचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन केल्यास सुमारे ८० टक्के अपघात टाळता येतात. यासाठी वाहनधारकांनी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे. अपघातात गेलेला जीव आणि झालेले नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे पश्चात्ताप होऊ नये, यासाठी वेळीच खबरदारी घेणे हिताचे ठरते.अपघात झाल्यानंतर अनेकदा रस्त्यांना दोष दिला जातो. रस्त्यात खड्डे आहेत, धोकादायक वळणे आहेत, सूचनाफलक नाहीत, संरक्षक कठडे नाहीत अशी कारणे सांगून वाहनचालकांच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, बहुतांश अपघात हे वाहनचालकांच्या चुकांमुळेच होतात ही वस्तुस्थिती आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे ज्ञान नसते. वळण घेताना इंडिकेटरचा वापर करत नाहीत. भरधाव वाहने चालवतात. ओव्हरटेक करतात. गर्दीतही यू- टर्न घेणारे महाभागही कमी नाहीत. दुचाकींना आरसे नसतात. मोजकेच दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात. महामार्गावरील प्रवास तर रामभरोसे असतो. महामार्गाच्या लगतच बाजार भरतात. विक्रेत्यांचे अतिक्रमण असते. वाहनांचे धोकादायक पार्किंग असते. कागल ते सातारा यादरम्यान महामार्गावर या समस्या गंभीर आहेत. सामूहिक प्रयत्नाने यात सुधारणा करणे शक्य आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक प्रशासन यांचे प्रयत्न आणि वाहनचालकांनी स्वतःहून वाहतूक नियमांचे पालन केल्यास बहुतांश अपघात टाळून प्रवास सुरक्षित होऊ शकतो. 

बायपास, उड्डाणपूल असावेतराष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गांचे रुंदीकरण होत आहे. वाढती वाहतूक लक्षात घेऊन हे मार्ग गावाबाहेरून काढणे गरजेचे आहे. त्यासाठी बायपास किंवा उड्डाणपुलांचा पर्याय अवलंबावा लागेल. तरच अपघातांचा धोका कमी होऊन प्रवास गतिमान आणि सुरक्षित होईल.

अशी घ्यावी दक्षता

  • परवाना सोबत असावा
  • वाहनाचा विमा आवश्यक
  • दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे
  • चारचाकीमध्ये सीटबेल्टचा वापर करावा
  • गतीच्या सूचनांचे पालन करावे
  • महामार्गावर लेन क्रॉसिंगवेळी इंडिकेटरचा वापर करावा
  • रस्त्याकडेला वाहन थांबवू नये
  • पार्किंग लाइटचा वापर करावा
  • वेळोवेळी वाहनांची देखभाल दुरुस्ती करावी

या सुधारणा आवश्यक

  • वाहतूक नियमांचे पालन व्हावे
  • ब्लॅक स्पॉटवर सुधारणा व्हाव्यात
  • रस्त्याच्या कडेला सूचनाफलक लावावेत
  • सर्व्हिस रोड अत्यावश्यक
  • महामार्गांवर दुचाकींना प्रवेशबंदी करावी
  • उलट्या दिशेने होणारी वाहतूक पूर्ण बंद व्हावी
  • ऊस वाहतुकीची वाहने रस्त्याकडेला थांबवू नयेत
  • वाहनांना रिफ्लेक्टर असावेत

जीव महत्त्वाचा की घाई?बहुतांश अपघात वाहनचालकांच्या घाईगडबडीतून होतात. वेळेत पोहोचण्यासाठी घाईत वाहने चालवून अपघातांना निमंत्रण दिले जाते. पाच-दहा मिनिटे उशिराने पोहोचल्यास काम होण्यास थोडा उशीर होईल. मात्र, अपघातात होणारे नुकसान भरून येत नाही. घाई टाळण्यासाठी पाच-दहा मिनिटे आधीच घराबाहेर पडावे. विशेषतः तरुणांनी याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट

  • कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर केरली फाटा, शिवाजी पूल ते वडणगे फाटा, आंबेवाडी ते रेडेडोह.
  • पुणे-बंगळुरू महामार्गावरील कणेरीवाडी फाटा, लक्ष्मी टेकडी, गोकुळ शिरगाव, किणी टोलनाका, वाठार उड्डाणपूल, अंबप फाटा, टोप, नागाव.
  • सांगली मार्गावरील हालोंडी ते अतिग्रे फाटा, कबनूर फाटा, गारगोटी मार्गावरील कळंबा ते कत्यायनी वळण.
  • तसेच मुरगूड नाका हे जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट आहेत.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात