शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विमाने उतरण्यासाठी सव्वाशेहून अधिक अडथळे, कोल्हापूर सल्लागार समिती बैठकीत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 22:02 IST

येथील विमानतळावर मोठी विमाने उतरविण्यासाठी सव्वाशेहून अधिक अडथळे आहेत. ते दूर करण्याची मागणी शुक्रवारी सकाळी विमानतळावर झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली.

कोल्हापूर : येथील विमानतळावर मोठी विमाने उतरविण्यासाठी सव्वाशेहून अधिक अडथळे आहेत. ते दूर करण्याची मागणी शुक्रवारी सकाळी विमानतळावर झालेल्या सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आली. वीज खात्याचे मोठे टॉवर हलविण्याचेही मोठे काम शिल्लक असून, याबाबत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे.खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सल्लागार समितीच्या पहिल्या बैठकीत कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

एकीकडे कोल्हापुरात मोठी विमाने उतरण्यासाठी तसेच रात्रीची सेवा सुरू राहण्यासाठी वाढीव धावपट्टी आवश्यक आहे. त्यासाठी नऊ एकरांहून अधिक जागा लागणार आहे. यामध्ये ३0 हून अधिक शेतकऱ्यांची जमीन असून तिची मोजणी करण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. विमानतळाच्या दक्षिण बाजूला सध्या वापरला जाणार रस्ता हा विमानतळाच्या हद्दीत असल्याने तो बंद करून पर्यायी रस्ता देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

गडमुडशिंगीच्या हद्दीत असणारे छोटे मंदिर, अनेक होर्डिंग्ज, टॉवर, सिंटेक्सच्या टाक्या असे एकूण १२५ पेक्षा अधिक अडथळे दूर करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. तेव्हा येथे वीजखात्याचे उपकेंद्र उभारण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा मोठा प्रश्न असून त्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचे ठरविण्यात आले.बैठकीनंतर खासदार महाडिक म्हणाले,भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने उजळाईवाडी विमानतळाचा विकास आराखडा तयार केला होता. सध्या विमातळावर १४ कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. ८0 कोटी रुपयांच्या कामाच्या निविदा निघाल्या आहेत. राज्य शासनानेही आपला ३0 टक्के खर्चाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे येथील कामे वेगाने सुरू असून विमानतळ लवकरच सुसज्ज होईल. प्रवाशांसाठीही आवश्यक सर्व सुविधा या ठिकाणी पुरविण्याच्या सूचना यावेळी महाडिक यांनी केल्या.

विमानतळ प्राधिकरणाच्या संचालिका पूजा के. मूल यांनी कामांविषयी सादरीकरण केले. बैठकीला महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, समीर शेठ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.नोकरीच्या अमिषापासून सावध राहण्याचे राजू शेट्टी यांचे आवाहनविमानतळाचा विकास वेगाने होत असल्यामुळे काही अपप्रवृत्ती विमानतळ प्राधिकरणात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार युवकांची फसवणूक करीत आहेत. अशा व्यक्तींपासून जनतेने सावध राहावे. सध्या विमानतळ प्राधिकरणात कोणत्याही प्रकारची भरती सुरू नाही. तसेच जी भरती होते, ती प्रशासकीय नियमांच्या अधीन राहून केली जात असल्यामुळे कोणीही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन बैठकीनंतर खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

 

 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूर