शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळमध्ये हिंसाचार; कोल्हापूर जिल्ह्यातील ५०० हून अधिक पर्यटकांनी प्लॅन केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 18:23 IST

नेपाळसाठी का मागणी

कोल्हापूर : नेपाळमधील सुंदर मंदिरे, स्वच्छता अन् एकूणच नेपाळच्या संस्कृतीची भुरळ उभ्या देशाला आहे. नेपाळचे हेच सौंदर्य पाहण्यासाठी कोल्हापुरातून प्रत्येक वर्षी हजाराच्या वर पर्यटक नेपाळला जातात. मात्र, नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर नेपाळ सहलीवर जाणाऱ्या कोल्हापुरातील ५०० हून अधिक इच्छुक पर्यटकांनी त्यांचा नेपाळ दौरा रद्द केला आहे.कोल्हापुरातून नेपाळसाठी प्रत्येक वर्षी हजारांहून अधिक पर्यटक जातात. यातील काही पर्यटक हे टुरिस्ट कंपन्यांकडून, तर काही पर्यटक स्वत:च्या वाहनाने नेपाळ गाठतात. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून नेपाळमध्ये हिंसाचार सुरू झाल्याने या पर्यटकांनी टूरिस्ट कंपन्यांना मेल पाठवून बुकिंग रद्द करण्याची विनंती केली आहे. मात्र, टूरिस्ट कंपन्यांनी विमानांचे तिकीट आधीच बुक केल्याने ते तिकीट रद्द करण्यास विमान कंपन्या तयार नाहीत. आम्ही सेवा द्यायला तयार आहे, असा पवित्रा विमान कंपन्यांनी घेतल्याने टूरिस्ट कंपन्यांचीही गोची झाली आहे.

नेपाळसाठी का मागणीभारतातून नेपाळला जाण्यासाठी व्हिसा लागत नाही. शिवाय शेजारचा देश असल्याने तेथे जाण्यासाठी खर्चही कमी येतो. त्यामुळे नेपाळला मोठ्या प्रमाणात कोल्हापुरातील पर्यटक जातात. गणेशोत्सव संपल्याने अनेकांनी नेपाळसाठीचे नियोजन केले होते. मात्र, अचानक तेथे हिंसाचाराची परस्थिती उद्भवल्याने पर्यटकांनी नेपाळचा प्लॅन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यात एक हजारांपेक्षा जास्त पर्यटक दरवर्षी नेपाळला जातात. नेपाळमध्ये हिंसाचाराची परस्थिती तयार झाल्याने जिल्ह्यातील ५०० पर्यटकांनी त्यांचा दौरा रद्द केला आहे. - बळीराम वराडे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन