शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
3
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
4
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
5
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
6
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
7
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
8
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
9
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
10
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
11
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
12
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
13
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
14
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
15
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
16
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
17
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
18
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
19
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

Kolhapur: हक्काची शाळा मिळाली.. ऊसतोड मजुरांची बालके हसली; बीडमधील २१०० विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात 

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: July 4, 2025 14:09 IST

‘लोकमत’मधील वृत्तानंतर अवनिच्या पाठपुराव्याला यश

इंदुमती गणेशकोल्हापूर : ऊसतोड हंगामात कोल्हापुरात सर्वाधिक स्थलांतरित होणाऱ्या बीडमधील २१००हून अधिक बालके शिक्षणाच्या प्रवाहात आली आहे. अवनि संस्थेने केलेल्या अहवालाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर बीड व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन ६ ते १४ वयोगटातील मुलामुलींच्या शिक्षणाची सोय केली आहे.

कोल्हापुरात २३ साखर कारखाने असून, येथील ऊसतोडीसाठी बीडमधील ९० टक्के मजूर सप्टेंबर ते मार्च या काळात कोल्हापुरात स्थलांतरित होतात. मुलामुलींच्या राहण्याचा, सुरक्षिततेचा, देखभालीचा, जेवणाचा असे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याने मजुरांसोबत त्यांची मुलंदेखील येतात. मुलींचे बालविवाह होतात. दुसरीकडे बीडमधील शाळांमध्ये त्यांची बोगस हजेरी दाखवली जाते, कोल्हापुरातील शाळांमध्ये त्यांना दाखल केले जात नसल्याने मजुरांची मुलं शाळाबाह्य राहातात हे अवनि संस्थेने केलेल्या अहवालात निदर्शनास आले.लोकमतमध्ये मार्च २०२४ मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर बीड व कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने याची तातडीने दखल घेतली, तर मानवी हक्क आयोगाने सुमोटो याचिका दाखल केली. त्यामुळे मागील वर्षात बालकांचे स्थलांतर कमी होऊन ते शिक्षणाच्या प्रवाहात आले आहेत.

  • बीडमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी ११ ठिकाणी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह सुरू झाले असून, त्यामध्ये १३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
  • ७ ते १४ वयोगटातील बालकांचे स्थलांतराचे प्रमाण कमी झाले.
  • मानवी हक्क आयोगाच्या सुमोटो याचिकेमुळे कोल्हापूरमधील जिल्हाधिकारी व शिक्षण विभागाने वारंवार बैठका घेऊन ७ ते १४ वयोगटातील ६४३ वयोगटातील बालकांना जवळील प्राथमिक शाळेमध्ये दाखल केले.
  • ३ ते ६ वर्षे वयोगटातील ४३६ बालकांना पोषण आहार सुरू झाला.
  • स्थलांतरित ठिकाणाहून ७ ते १४ वयोगटातील बालकांना मूळगावातील शाळेमधून शिक्षण हमी कार्ड मिळाले.

अंगणवाड्यांची मात्र प्रतीक्षाचबीडमधील ६ ते १४ वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची सोय झाली असली तरी पालकांसोबत येणाऱ्या ० ते १४ वर्षे वयोगटातील बालकांसाठी अंगणवाड्या नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही अपवाद वगळता जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी अंगणवाड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.

शिक्षण हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. मराठवाड्यात वसतिगृहांची संख्या वाढवून सर्व सोयीसुविधा दिल्या तर १४ वर्षांपर्यंतच्या मुलामुलींचे स्थलांतर थांबून त्यांने शिक्षण सुरू राहील. परिणामी बालविवाह व बालकामगारांचे प्रमाण कमी होणार आहे. अंगणवाड्या सुरू करण्यावर भर द्यावा. - अनुराधा भोसले, अध्यक्षा, अवनि संस्था