शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ धरणांत ५५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा, ‘दूधगंगा’ ३८ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 13:16 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘घटप्रभा’, ‘जांबरे’ व ‘कोदे’ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, नऊ धरणांत ५५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. चिकोत्रा ४७ टक्के, तर दूधगंगा अवघे ३८ टक्के भरले आहे. रविवारी सकाळपासून पावसाची उघडझाप सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घसरण होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसांत अडीच फुटांनी कमी झाली आहे. अद्याप १९ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत आहे.

ठळक मुद्दे नऊ धरणांत ५५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा, ‘दूधगंगा’ ३८ टक्के भरले पावसाच्या उघडझापीमुळे नद्यांची पातळी ओसरली

कोल्हापूर : जिल्ह्यातील ‘घटप्रभा’, ‘जांबरे’ व ‘कोदे’ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून, नऊ धरणांत ५५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. चिकोत्रा ४७ टक्के, तर दूधगंगा अवघे ३८ टक्के भरले आहे. रविवारी सकाळपासून पावसाची उघडझाप सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घसरण होत आहे. पंचगंगेची पातळी दिवसांत अडीच फुटांनी कमी झाली आहे. अद्याप १९ बंधारे पाण्याखाली असल्याने वाहतूक विस्कळीत आहे.रविवारी सकाळी जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी दहानंतर त्याने उघडीप दिली. पूर्वेकडे काही काळ सूर्यनारायणाने दर्शनही दिले; पण गगनबावडा, शाहूवाडी, आजरा, चंदगड तालुक्यांत पाऊस कायम राहिला. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात १११.९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ४७ मिलिमीटर झाला. शाहूवाडीत २२.६७, तर शिरोळमध्ये आकडेवारी निरंक राहिली. धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. राधानगरी धरण ६६ टक्के भरले असून, त्यातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १२०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भोगावतीच्या पाण्याची फुग कायम राहिली आहे. त्याशिवाय घटप्रभा, जांबरे व कोदे धरणांतून विसर्ग सुरूच आहे.

नद्यांच्या पातळीत घसरण होत असून, पंचगंगा सायंकाळी सहा वाजता ३१.४ फुटांवर होती. जिल्ह्यातील १९ बंधारे अद्याप पाण्याखाली असून, एका सार्वजनिक, तर सात खासगी मालमत्तांची पडझड होऊन तीन लाख ६५ हजारांचे नुकसान झाले आहे. पंचगंगेचे पाणी कमी झाल्याने नदीघाटावरील मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर