शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

अपंगांसाठी १२ कोटींहून अधिक रकमेची साधने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:41 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या वर्षीपासून राबविण्यात येत असलेल्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’ला चांगले यश मिळण्याची चिन्हे असून, १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची वैविध्यपूर्ण साधने दिव्यांगांना पुरविण्यात येणार आहेत. यासाठी आता जिल्ह्यात तालुकावार तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअपंगांसाठी १२ कोटींहून अधिक रकमेची साधने, तालुकावर तपासणी शिबिरेजिल्हा परिषदेच्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’चे यश

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या वतीने गेल्या वर्षीपासून राबविण्यात येत असलेल्या ‘दिव्यांग उन्नती अभियान’ला चांगले यश मिळण्याची चिन्हे असून, १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची वैविध्यपूर्ण साधने दिव्यांगांना पुरविण्यात येणार आहेत. यासाठी आता जिल्ह्यात तालुकावार तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गतवर्षी सुरुवातीला ७ जुलै रोजी गृहभेटीद्वारे दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात २१ प्रकारच्या दिव्यांगांमध्ये ४१ हजार १३६ दिव्यांगांची आॅनलाईन नोंद करण्यात आली. आता तिसºया टप्प्यामध्ये या सर्वांना साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता.त्यानुसार या विभागाकडून अलिम्को कंपनीला कोल्हापूर जिल्ह्यात तपासणी शिबिरे आयोेजित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ११ एप्रिल २०१९ रोजी या कंपनीचे प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा परिषदेत येऊन त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, ज्यांनी या योजनेची संकल्पना मांडून तिची अंमलबजावणी सुरू केली, ते सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ तसेच ज्या विभागांतर्गत ही योजना सुरू आहे, ते समाजकल्याण विभागाचे प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्याशी चर्चा केली. यावेळी यासाठी कार्यरत असलेल्या स्वाती गोखले यादेखील उपस्थित होत्या.आता ११ ते २६ मे २०१९ या कालावधीत भुदरगड, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कोल्हापूर, इचलकरंजी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी येथे तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.यासाठीची जिल्हास्तरीय कार्यशाळा मंगळवारी (दि. ३० एप्रिल) झाली असून २ ते ६ मे दरम्यान तालुकास्तरीय, तर ७ मे रोजी ग्रामपंचायत स्तरावरील कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. त्या-त्या तालुक्यांच्या शिबिराच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार असून, सकाळी ८.३० ते सायंकाळी पाच या वेळेत ही शिबिरे होणार आहेत. यासाठी प्रत्येक पंचायत समितीला २५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त या शिबिराला जो खर्च येईल, तो स्थानिक पातळीवर दानशूर व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून करावा, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. तालुक्याला शाळेच्या ठिकाणी हे शिबिर घ्यावे. तसेच तेथे मंडप उभारावा, पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची व्यवस्था असावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

नेण्या-आणण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीमार्फतत्या-त्या गावातील दिव्यांगांची शिबिरामध्ये ने-आण करण्यासाठी ग्रामपंचायतीने जबाबदारी घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून, त्या-त्या मार्गावरील ग्रामपंचायतींनी हा खर्च विभागून करावा. तसेच शासकीय वाहनातूनही या दिव्यांगांना आणण्याची व्यवस्था करावी, असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे.

हे मिळणार साहित्यया शिबिरात केवळ दिव्यांगांची तपासणी होणार असून, त्यांना गरजेनुसार व्हीलचेअर, ट्रायसिकल, कुबड्या, एल्बो क्रचेस, रोलेटर, कॅलिपर, कृत्रिम अवयव, श्रवणयंत्र, एमआर किट, स्मार्ट केन, लो व्हिजन कट, डायसी प्लेअर, कुष्ठरोग किट या साहित्याचे दोन महिन्यांनंतर वितरण करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेने महत्त्वाकांक्षी असा ‘दिव्यांग उन्नती अभियान’ हा उपक्रम गेल्या वर्षीपासून सुरू केला असून, यामध्ये दिव्यांगांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली आहे. या सर्वांना आवश्यक असणारी साधने पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेने संबंधित विभाग आणि कंपन्यांशी संपर्क साधला आहे. यातील पुढचा टप्पा म्हणून तालुकास्तरावर तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली असून, यावेळी दिव्यांग अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून या योजनेचा फायदा घेतला, असा विश्वास आहे.- शौमिका महाडिक, अध्यक्षा, जिल्हा परिषद, कोल्हापूर

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर