कोल्हापूर : सलग तिसऱ्यादिवशी कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे शंभरहून अधिक रुग्ण नोंदविण्यात आले आहेत, तर चारजणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात नव्या १८८ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे; तर चौघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या १००४ इतकी झाली आहे.
यामध्ये कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील ७७ रुग्णांचा समावेश आहे. आजरा तालुक्यात १३, भुदरगडमध्ये ६, चंदगड १, गडहिंग्लज१०, हातकणंगले ३, कागल ४, करवीर १४, पन्हाळा २, राधानगरी ३, शाहूवाडी ५, नगरपालिका क्षेत्रामध्ये २८, तर अन्य जिल्ह्यांतील १४ जणांचा कोरोना रुग्णांमध्ये समावेश आहे. दिवसभरामध्ये ६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत ५४२ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, १४८९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १८१ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे.
चौकट
वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीही बाधित
दोन दिवसांपूर्वी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पाच विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे येथील शेंडा पार्कमध्ये भरवण्यात येणारे प्रत्यक्ष वर्ग बंद करण्यात आले असून, ऑनलाईन अध्यापन सुरू करण्यात आले आहे.