शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा स्मशानभूमीत ९0 हजार पेक्षा जास्त शेणीदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 16:08 IST

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतो. वर्षाला सुमारे ३५ लाख शेणी लागतात. सामाजिक बांधिलकी तसेच पर्यावरणपूरक होळी ...

ठळक मुद्देपंचगंगा स्मशानभूमीत ९0 हजार पेक्षा जास्त शेणीदान मंडळाचा पुढाकार : वर्षाला ३५ लाख शेणींची गरज

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतो. वर्षाला सुमारे ३५ लाख शेणी लागतात. सामाजिक बांधिलकी तसेच पर्यावरणपूरक होळी अशा दुहेरी उद्देशाने होळीनिमित्त सोमवारी ९0 हजार शेणीदान केल्या. कोल्हापुरातील १५ पेक्षा जास्त मंडळ, नागरीकसह अधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे.

होळीला शहरातील विविध संस्थांकडून पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान केल्या जातात. यंदाही या उपक्रमात खंड पडला नाही. महापालिका कर्मचारी, मानसिंग पाटील युवा मंच, कृष्णा मित्र मंडळ, रोहित घळसासी मित्र मंडळ, उदय माळी, नेहरु नगर मित्र मंडळ, दत्त ग्रुप हॅपी क्लब, लक्षतीर्थ विकास फौंडेशन, हुन्नुर गल्ली, मैत्री कट्टा ग्रुप अशा विविध संस्थांनी शेणी स्मशानभूमीस दिल्या.

लक्षतीर्थ विकास फौंडेशनचा अनोखी भेटरक्षाविसर्जनावेळी बादल्या, तांबे असे साहित्य लागते. लक्षतीर्थ विकास फौंडेशनच्यावतीने याचा विचार करुन होळी निमित्त पंचगंगा स्मशानभूमीकडे ४ स्टीलच्या बादल्या, ४ सुपल्या, ५ तांबे असे साहित्य देण्यात आले. या फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समिती देणार सव्वा दोन लाख शेणीसानेगुरुजी परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सवा समितीच्यावतीने दरवर्षी होळी दिवशी पंचगंगा स्मशानभूमीस शेणी दान केल्या जातात. यावर्षी रविवारी (दि.१५) सकाळी ९ वा. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये २ लाख २५ हजार शेणीदान करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे गुरुप्रसाद जोशी यांनी दिली आहे.आरोग्य निरिक्षकांकडूनही शेणीदानमहापालिकेकडे आरोग्य निरिक्षकपदावर असणाऱ्या शुभांगी पवार यांनी पंचगंगा स्मशानभूमीला २ हजार शेणीदान केल्या. रोख स्वरुपात मदत करण्याऐवजी त्यांनी शेणीदान केल्या. 

 

टॅग्स :Holiहोळीkolhapurकोल्हापूर