शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर महानगरपालिका मुख्य कार्यालयावर शिवसेना फेरीवाला संघटनेमार्फत मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 16:54 IST

गेल्या काही दिवसापासून शहरात अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली असल्यामुळे शिवसेना फेरीवाला संघटनेमार्फत महानगरपालिका मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गंगावेश येथून सुरु झालेला हा मोर्चा दुपारी बारा वाजता महापालिकेसमोर पोहचला. त्याठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देकोल्हापूर महानगरपालिका मुख्य कार्यालयावर शिवसेना फेरीवाला संघटनेमार्फत मोर्चा फेरीवाल्यांना हात लावाल तर उखडून टाकू, आमदार क्षीरसागर यांचा इशारा

कोल्हापूर : गेल्या काही दिवसापासून शहरात अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु केली असल्यामुळे शिवसेना फेरीवाला संघटनेमार्फत महानगरपालिका मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गंगावेश येथून सुरु झालेला हा मोर्चा दुपारी बारा वाजता महापालिकेसमोर पोहचला. त्याठिकाणी जोरदार निदर्शने करण्यात आली.

मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यावेळी आमदार क्षीरसागर यांनी आक्रमक भाषण करताना फेरीवाल्यांना हात लावाल तर उखडून टाकण्यात येईल, असा इशारा दिला. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न करताच जर बेकायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर फौजदार गुन्हा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.मोर्चाच्या सामोरे जाऊन अतिरीक्त आयुक्त श्रीधर पाटणकर यांनी निवेदन स्वीकारले. मोर्चाचे नेतृत्व आमदार क्षीरसागर, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, धनाजी दळवी, किशोर घाडगे, रघुनाथ टिपुगडे, दिपक गौड यांनी केले. मार्चात शिवसैनिकांसह फेरीवालेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

धोरणाची अंमलबजावणी होईपर्यंत कारवाई थांबवाफेरीवाल्यांचे शिष्टमंडळ महापौर सरिता मोरे यांना भेटले. महापौर मोरे यांनी स्थायी समितीच्या सभागृहात आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरीक्त आयुक्त पाटणकर, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, चारही विभागीय कार्यालयाचे प्रमुख, अतिक्र मण विभाग प्रमुख पंडीत पोवार यांची एक संयुक्त बैठक घेतली. त्यावेळी आमदार क्षीरसागर यांनी राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबबवावे, समिती स्थापन करावी, झोन निश्चित करावे अशा मागण्या केल्या.

त्यावेळी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरु झाले असून ते पूर्ण झाल्यानंतर फेरीवाल्यांचे प्रतिनिधी समितीवर घेण्यात येतीत. झोन निश्चिती करण्यात येईल अशी ग्वाही दिली. जे विक्रेते किंवा फेरीवाले वाहतुकीला अडथळा येईल अशा पद्धतीने रस्त्यावर असतील त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल आणि आमची कारवाई अशाच फेरीवाल्यांवर सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर