शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीच्या नियोजनासाठी पाहणी; तावडे हॉटेल येथे महिन्यात ट्रक टर्मिनस-- : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:22 IST

वीजपुरवठ्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. जेसीबीच्या सहाय्याने परिसराचे तातडीने सपाटीकरण करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. उर्वरित जागेवर पीक लावले असून, ते कापून घेण्यात येणार आहे.

कोल्हापूर : तावडे हॉटेल येथील राष्ट्रीय महामार्गालगत आरक्षित असणाऱ्या जागेवर महिन्यात ट्रक टर्मिनस महिन्यात सुरू करणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली. शहरातील वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात त्यांनी ट्रक टर्मिनसची जागा, गाडीअड्डा आणि शिरोली नाका येथील जागेची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. गाडीअड्डा येथे पार्किंग आणि भक्तनिवासाची निविदा प्रसिद्ध करण्याचे आदेशही दिले. गाड्डीअड्डा ट्रक टर्मिनस येथे स्थलांतर करण्याच्याही सूचना केल्या.

कोल्हापूर शहरातील वाहतुकीच्या समस्यावर गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पाहणी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार पालकमंत्री पाटील, महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी गांधीनगर, तावडे हॉटेलसह शहरात पाहणी केली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘तावडे हॉटेल येथे महापालिकेची २३ एकर जागा असून यापैकी ट्रक टर्मिनससाठी जागा आरक्षित आहे. सध्या साडेतीन एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आहे. त्यापैकी एक एकर जागेत महिन्याभरात ट्रक टर्मिनस सुरू करण्याचे नियोजन आहे. वीजपुरवठ्यासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. जेसीबीच्या सहाय्याने परिसराचे तातडीने सपाटीकरण करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. उर्वरित जागेवर पीक लावले असून, ते कापून घेण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात येथील सर्वच परिसर विकसित करून शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्याचा प्रयत्न आहे.

गांधीनगर परिसरातील मणेरमळा येथे महापालिकेची १ एकर जागा आहे. या जागेचीही पाहणी करण्यात आली. मात्र, या जागेत ट्रकचा प्रवेश अथवा बाहेर जाण्याचा मार्ग अडचणीचा असल्याने पुढील टप्प्यात येथील नियोजन करण्यात निर्णय झाला. यावेळी स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, उपमहापौर संजय मोहिते, गटनेते सुनील पाटील, नगरसेवक भूपाल शेटे, राहुल चव्हाण, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर, लॉरी असोसिएशनचे सुभाष जाधव, अशोक पोवार, रमेश मोरे, गणी आजरेकर, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, इस्टेट अधिकारी सचिन जाधव, आदी उपस्थित होते.

तीर्थक्षेत्र विकासासाठी २९ रोजी बैठकअंबाबाई तीर्थक्षेत्राच्या कामांच्या आढाव्यासाठी शनिवार (दि.२९) महापालिकेत बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील ८० कोटींपैकी ७ कोटींचा निधी मिळाला असून, उर्वरित निधी तत्काळ मिळणेव पुढील कामांची चर्चा करण्यात येणार आहे.

पालकमंत्री म्हणाले,

  • ट्रक टर्मिनसचा परिसर जेसीबीच्या साहाय्याने तत्काळ सपाटीकरण

करून घ्या. 

-गाडीअड्डा तावडे हॉटेल

-येथील ट्रक टर्मिनस येथे स्थलांतर करणे,-महापालिकेने गाडीअड्डा येथील पार्किंग, भक्तनिवासाची तत्काळ निविदा काढा-शिरोली नाका येथील महापालिकेच्या जागा ताब्यात घेऊन आरामबस पार्किंग करणे-वाहने पार्किंग केल्यानंतर गाडीअड्डा ते अंबाबाई मंदिरसाठी ‘ई’ कारची सुविधा करणार-पार्किंग केलेली वाहने बाहेर जाण्यासाठी गाडीअड्डा ते विल्सन पूल मार्ग तयार करणे

 

तावडे हॉटेल येथे २३ एकर २० गुंठे जागा असून २० एकर जागा ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया केली जाणार आहे. संबंधितांना नोटीस काढून टीडीआरच्या माध्यमातून नुकसानभरपाई देऊन उर्वरित जागाही ताब्यात घेतली जाईल. शिरोली नाक्यालगत ४९ हजार स्क्वेअर फूट जागा महापालिकेची असून, या जागेचा वापर आरामबस पार्किंगसाठी करणे शक्य आहे.- नेत्रदीप सरनोबत,शहर अभियंता. महापालिका,

पहिल्या टप्प्यामध्ये तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या आरक्षित जागेत १०० ट्रक थांबतील, या क्षमतेचे ट्रक टर्मिनस करण्यात येणार आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी फुटावी यासाठी जे काही करणे शक्य आहे ते सर्व केले जाईल.- सतेज पाटील,पालकमंत्री

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलTrafficवाहतूक कोंडी