शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनचा मुक्काम वाढणार! ‘ला निना’चा प्रभाव : सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 09:38 IST

देशातील जवळपास निम्मी शेतजमीन जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून असते. 

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : भारतातील मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत. ‘ला निना’मुळे तयार होणाऱ्या कमी दाबामुळे  सप्टेंबर शेवटच्या आठवड्यापर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. 

भारतात जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते व सप्टेंबरमध्ये त्याचा परतीचा प्रवास सुरू हाेतो. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो.  ३.५ ट्रिलियन रुपयांच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मान्सूनमुळे भारताचे ७० टक्के जलसाठे भरले जातात. सिंचनाशिवाय, देशातील जवळपास निम्मी शेतजमीन जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून असते. 

‘ला निना’मुळे भारतात सप्टेंबर आणि  ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वीही ‘ला निना’मुळे मान्सून परतण्यास उशीर झाला होत, असेही ते म्हणाले. 

- सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सोयाबीन, मका, भात, कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार. - जमिनीत ओलावा राहून खरीप हंगामातील गहू, हरभरा या पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. 

अतिवृष्टीमुळे गुजरातमध्ये अनेक ठिकाणी पुराने थैमान घातले. पाऊस कमी झाला तरी बडाेदा येथे पूरस्थिती कायम आहे. बडाेद्यात चिमुकल्याला सुरक्षित ठिकाणी नेताना लष्कराचा जवान.

सरासरीपेक्षा जास्त पाऊसभारतात  यावर्षी सरासरीपेक्षा सुमारे ७ टक्के जास्त पाऊस पडला आहे.  काही राज्यांत तर सरासरीपेक्षा ६६ टक्के जास्त पाऊस पडला आहे.  

पिकांच्या पेरणीवर परिणामखरीपाची काढणी साधारणपणे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून केली जाते. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे काढणीस आलेल्या भात, सोयाबीन मका आणि कडधान्यासारख्या पिकांचे नुकसान होऊ शकते. याचवेळी या पावसाने जमिनीतील ओलावा वाढून त्याचा फायदा गहू, शाळू, हरभरा यासारख्या रब्बी पिकांच्या लागवडीत वाढ होण्यात होऊ शकतो.

गुजरातमध्ये पूरपरिस्थिती कायमअहमदाबाद : गुजरातमधील पावसाचा जोर ओसरल्याने गुरुवारी परिस्थिती सुधारली. परंतु, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती मात्र कायम आहे. त्यातही वडोदरा आणि आणखी काही शहरांत पूरपरिस्थिती कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या दिवशी फोनवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. मागील तीन दिवसांत राज्यामध्ये पावसाशी संबंधित दुर्घटनांत २६ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :weatherहवामान