शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वळीव पावसाने हेरले, मौजे वडगावंमध्ये लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 13:58 IST

शेतकऱ्यांना या पावसाने थोडासा दिलासा मिळाला. पावसापूर्वी सुटलेल्या वाऱ्यामुळे हेरले व मौजे वडगाव येथे  काही ठिकाणी फांद्या तुटून पडल्या तसेच जनावरांचा गोठा,घरावरील पत्रे, ग्रीन हाऊस चे  लाखो रुपयांचे नुकसान झाले. 

हेरले : वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह जवळपास पाऊण तास झालेल्या पावसाने पाणीच पाणी केले. सातत्याने ३७ ते ४० अंशापर्यंत गेलेल्या तापमानाने काहिली झालेल्या नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना या पावसाने थोडासा दिलासा मिळाला. पावसापूर्वी सुटलेल्या वाऱ्यामुळे हेरले व मौजे वडगाव येथे  काही ठिकाणी फांद्या तुटून पडल्या तसेच जनावरांचा गोठा,घरावरील पत्रे, ग्रीन हाऊस चे  लाखो रुपयांचे नुकसान झाले.     हेरले येथील दादासो बाळू कोळेकर यांचे ग्रीन हाऊसवरील पेपर ७५ टक्के फाटलेले आहे.या ग्रीन हाऊस मध्ये रंगीत ढोबळी मिरचीची झाडे उन्मळून पडले आहेत. यामध्ये ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आण्णा बाळू कोळेकर यांच्याही ग्रीन हाऊस मधील ५५ टक्के पेपर फाटला असून सव्वा ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सचिन जयगोंडा पाटील यांच्या जनावरांच्या गोट्याचे शेड वरील पत्र्याचे शेड उडून गेले असून जवळपास एक लक्ष रूपयाचे  नुकसान झाले असून शेड नाहीसा झाला आहे. शौकत रमजान पेंढारी यांचाही जनावरांचा गोठयाचे पत्र्याचे शेड उडून गेले आहे अंदाजी पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.त्यामधील या गाईला किरकोळ दुखापत झाली आहे.पारीसा शंकर चौगुले सत्यांना मळा येथील घरावरील शेड उडून गेले असून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.          मौजे वडगांव येथील योगेश शेंडगे संजय शेंडगे व विश्वास शेंडगे यांच्या दुकान गाळ्याच्या  दुसऱ्या मजल्यावरील चॅनेलसह पत्रे उडून खाली पडले त्यांचे अंदाजे पाच हजार रूपयांचे नुकसान झाले. म्हलारी तांदळे यांचे गोठयाचे शेड पडले, राजकुमार चौगले घराची छपरी व डीश तुटला , अभिजीत थोरवत गारमेंट शेड पडले, आनंदा थोरवत यांचे मळ्यातील गोठयाचे छ्परी कोसळली, रंगराव जांभळे यांचे गोठ्याचे शेड कोसाळले. आदी ठिकाणी प्रत्यक्षपणे तलाठी संदिप बरगाले व कोतवाल महंमद जमादार यांनी नुकसानग्रस्त ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली.       

२०१९ ला आलेल्या महापुरातून कुठेतरी सावरत असताना कोरोना  च्या तडाख्यात सापडलो तोपर्यंत काल झालेल्या वादळी पाऊसाने पार कंबरडे मोडले. अतोनात नुकसान झाले. शासनाच्या सहकार्याशिवाय मोडकळीस आलेला कणा सरळ होणे खूप अशक्य आहे...           - दादासो बाळू कोळेकर

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस