शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनची चाहूल, दिवसभर पावसाची रिपरिप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 14:40 IST

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाने सुरुवात केली. पावसाची रिपरिप आणि गार वारे पाहता मान्सूनची चाहूल लागली असून, कोणत्याही क्षणी मान्सून सक्रिय होईल, असे वातावरण तयार झाले आहे. दुपारी चारनंतर एकसारखा पाऊस सुरू राहिला. मंगळवारी रात्रीपासून पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात मान्सूनची चाहूल, दिवसभर पावसाची रिपरिपगगनबावडा, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडीत जोरदार पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात सकाळपासून पावसाने सुरुवात केली. पावसाची रिपरिप आणि गार वारे पाहता मान्सूनची चाहूल लागली असून, कोणत्याही क्षणी मान्सून सक्रिय होईल, असे वातावरण तयार झाले आहे. दुपारी चारनंतर एकसारखा पाऊस सुरू राहिला.मंगळवारी रात्रीपासून पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली.

रात्रीही जोरदार पाऊस कोसळला. सकाळपासून ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी जोरदार, तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. सकाळी नऊ वाजल्यापासून अकरापर्यंत पाऊस राहिला. दुपारी काहीकाळ उघडीप राहिली; पण चारनंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली. तब्बल तीन तास पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. सायंकाळी साडेसहानंतर पावसाचा जोर काहीसा ओसरला.मान्सूनसारखे हवामान तयार झाले असून गार वारे व पावसाच्या सरीने मान्सूनची चाहूल लागली आहे. बुधवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५४.१४ मिलिमीटर पाऊस झाला. गगनबावड्यात २६.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यांत चांगला पाऊस झाला. धरणक्षेत्रातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. राधानगरी धरणक्षेत्रात २६, तर पाटगाव ६६ व कोदे धरणक्षेत्रांत ६२ मिलिमीटर पाऊस झाला. आज, गुरुवारीही जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

भुईमूग पेरणीला गतीपावसाअभावी खोळंबलेल्या भुईमूग व कडधान्यांच्या पेरणीला आता गती आली आहे. पेरणीयोग्य पाऊस असल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे.‘मृग’ शेवटी बरसणार?यंदा ८ जून रोजी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला; पण सुरुवातीच्या टप्प्यात त्याने हुलकावणी दिली. शनिवारी (दि. २२) रोजी सूर्य ‘आर्द्रा’ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे मृग नक्षत्राचे दोनच दिवस राहिले असून, या दिवसांत पाऊस चांगला लागण्याचा अंदाज आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर