शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनची चाहूल अन् बळिराजाची धांदल

By admin | Updated: May 29, 2017 00:32 IST

मान्सूनची चाहूल अन् बळिराजाची धांदल

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, तसे वातावरण तयार होऊ लागले आहे. सकाळी दहापर्यंत सगळीकडे ढगाळ वातावरणासह वाहणारे वारे मान्सूनची चाहूल देत असल्याने बळिराजाची चांगलीच धांदल उडाली आहे. खरीप मशागतीसह पेरणीसाठी शिवारे माणसांनी अक्षरश: फुलून गेली असून, जिल्ह्याच्या पश्चिमेकडे भाताच्या धूळवाफ पेरण्यांचे काम जोरात सुरू झाले आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात, नागली, ज्वारी, भुईमूग, सोयाबीन यांसह कडधान्ये घेतली जातात. साधारणत: अडीच लाख हेक्टरमध्ये खरिपाची लागवड होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाच्या क्षेत्रात तब्बल नऊ हजार हेक्टरनी वाढ झाली आहे. यावर्षी सगळीकडेच वळीव पावसाने चांगली हजेरी लावल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. उन्हाळी भुईमूग, भाजीपाला काढून खरीप पेरणीसाठी जमिनी तयार करण्यात शेतकरी मग्न झाला आहे. त्यात मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आणि त्यानुसार मान्सूनचे मार्गाक्रमण सुरू आहे. अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला असून, त्याची केरळकडे गतीने वाटचाल सुरू आहे. येत्या दोन-तीन दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज असला तरी दोन दिवस झाले वातावरणात कमालीचा बदल झाला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जसे वातावरण असते, तसे वातावरण जिल्ह्यात सकाळी पाहावयास मिळत आहे. उन्हाअगोदर मशागत करून पेरणीसाठी जमिनी तयार करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो; त्यामुळे सकाळी सहा वाजताच शिवारे माणसांनी फुलून जात आहेत. करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांत भाताच्या धूळवाफ पेरण्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात. भाताचे १ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ४ हजार हेक्टरपेक्षा अधिक भाताच्या धूळवाफ पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. डोंगरमाथ्यावर भात व नागली रोपांच्या लागणीसाठी तरवा टाकण्याची तयारी सुरू आहे. ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, तिथे भाताच्या पेरणीनंतर पाणी दिले जात आहे.