शहरं
Join us  
Trending Stories
1
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
2
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
3
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
4
Viral Video: गळ्यात गमछा, कमरेला लुंगी! भोजपुरी गाण्यावर तरुणीचा जबरदस्त डान्स, नेटकरी झाले फिदा
5
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
6
३ दिवसांत २७% नी वाढला 'हा' छोटा शेअर; एकावर १ फ्री स्टॉक देणार कंपनी, शेअर विभाजनाचीही घोषणा
7
आता 'स्वदेशी'चं काय झालं..?; लोकपाल सदस्यांना ७० लाखांची BMW देण्यावरून राजकारण तापलं !
8
जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा
9
कठीण काळात आणखी घट्ट होतेय भारत-रशिया मैत्री; प्लॅन जाणून ट्रम्प यांचा आणखी थयथयाट होणार!
10
सर्वसामान्यांसाठी खुशखबर...! लग्नसराईपूर्वीच सोन्या-चांदीच्या भावात घसरण, चेक करा १८,२२,२३ अन् २४ कॅरेटचा लेटेस्ट रेट
11
जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू
12
जिद्दीला सॅल्यूट! अवघ्या २२ व्या वर्षी झाली IAS; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
13
“आम्हाला राहुल गांधींना PM करायचेय, काँग्रेस मुंबईचे महापौरपद काय घेऊन बसलेय”: संजय राऊत
14
Gulab Jamun : ना गुलाब ना जामून, मग या गोड पदार्थाला कसं पडलं हे नाव? सगळ्यांनाच खायला आवडतं पण माहिती कुणालाच नसेल!
15
इंदूरमध्ये पेंटहाऊसला भीषण आग; 'डिजिटल लॉक' अडकल्याने काँग्रेस नेत्याचा गुदमरून मृत्यू, पत्नी, मुलीची प्रकृती चिंताजनक
16
कुटुंबीयांना कॉल केला अन्...; रशियात नदीकाठी सापडले कपडे, ३ दिवसांपासून अजित बेपत्ता
17
Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप
18
Railway Accident: 'रील'चे वेड जीवावर बेतले; रेल्वेच्या धडकेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू
19
"त्यांचा काहीतरी व्हिडीओ हाताला..."; मुंबईत कमळ फुलणार म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर मनसेचा निशाणा
20
महाआघाडीचं ठरलं, बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार, तर उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची घोषणा

माकड आलं अन् दुचाकीची चावी घेऊन गेलं, इचलकरंजी येथील गमतीशीर प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 12:19 IST

नेहमी वर्दळ असलेल्या कोल्हापूर रोडवरील एएससी कॉलेजवळ घडलेला हा प्रकार.

भरत बुटाले -कोल्हापूर : इचलकरंजीत गुरुवारी सकाळी मर्कटलीला पाहायला मिळाली. नेहमी वर्दळ असलेल्या कोल्हापूर रोडवरील एएससी कॉलेजवळ घडलेला हा प्रकार.घडलं असं, गुरुवारी सकाळी पावणेनऊ वाजता एएससी कॉलेजजवळच्या दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी एकजण दारात मोटारसायकल लावून गेला. त्याने मोटरसायकलला चावी तशीच ठेवली होती. तितक्यात एक माकड आलं आणि चावी काढून घेऊन छपरावर जाऊन बसलं. हे ज्यांनी पाहिलं ते आश्चर्यचकित झाले आणि तुमच्या गाडीची चावी घेऊन माकड गेलं, असं एकदम ओरडले. हे ऐकताच त्या गाडीमालकाने डोक्याला हात लावला. मग माकडाने चावी खाली टाकावी म्हणून सुरू झाले प्रयत्न. शेजारी बसलेल्या प्रत्यक्षदर्शी भाजी विक्रेत्याकडून काकडी घेऊन माकडाकडे फेकली.नंतर गाजर टाकलं तरीही त्यांनं चावी खाली टाकली नाही. खाली गर्दी असूनसुद्धा ते निम्म्यावर येऊन फळीवर बसलं. दहा मिनिटांनंतर ते गाडीजवळ चावी टाकून रस्त्याच्या पलीकडे रिक्षावर जाऊन बसलं. हटकूनसुद्धा तिथेच बसलं. मग रिक्षा चालकाने त्याला दुकानातला खाऊ दिला. दाबात बसून तो खाल्ला पण ते हलायला काही तयार होईना. शेवटी कस्टमर आल्यामुळे रिक्षा चालू केली, त्यावेळी ते उडी मारून झाडावर जाऊन बसलं.  तेथे जमलेली गर्दी ही गंमत पहात थांबली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Monkey steals motorcycle key in Ichalkaranji, hilarious incident unfolds.

Web Summary : In Ichalkaranji, a monkey stole a motorcycle key from a parked vehicle near ASC College. Attempts to retrieve the key with food failed initially. Eventually, the monkey dropped the key and later perched on a rickshaw before finally leaving.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरMonkeyमाकडbikeबाईक