कोल्हापूर : अवैध व्यावसायिकांशी सलगी असणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही. प्रत्येक पोलिसांवर देखरेख ठेवा, पोलिस ठाण्यात येणाऱ्या गोरगरीब लोकांना न्याय द्या. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पोलिस आहेत. एखादा प्रश्न सोडविण्यामध्ये चालढकल केल्यास खपवून घेणार नाही, अशा कडक शब्दांत शनिवारी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.भ्रष्टाचार, खून, अमानुष मारहाण, घरफोड्या, लुटमार, आदी घटनांमध्ये पोलिसांचा सहभाग वाढू लागल्याने कोल्हापूर पोलिस दलाची बदनामी होऊ लागली आहे. ‘लोकमत’मधील वृत्ताची गांभीर्याने दखल घेत जिल्ह्यांतील २८ पोलिस ठाण्यांचा ‘पंचनामा’ पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी केला. जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असताना एकीकडे लाचखोर पोलिसांची संख्याही वाढत आहे. सीपीआर कैदी वॉर्डातील ओली पार्टी आणि हुपरी पोलिसांची लुटमार या दोन्ही घटनांमुळे पोलिस दलाची नाचक्की झाली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी पोलिस उपअधीक्षक व निरीक्षकांना गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांना खड्यासारखे बाजूला करा, ठाण्यातील प्रत्येक पोलिसांवर देखरेख ठेवा, पोलिस ठाण्यात हजेरीच्यावेळी सर्वांना कडक सूचना द्या, एखाद्याची अवैध व्यावसायिकांशी सलगी असल्याचे आढळल्यास त्यांना घरचा रस्ता दाखवा, गोरगरीब लोकांना न्याय द्या. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पोलिस आहेत. एखादा प्रश्न सोडविण्यामध्ये चालढकल केल्यास खपवून घेणार नाही, अशा कडक शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले.‘लोकमत’चे अभिनंदन ‘हे पोलिस आहेत की दरोडेखोर? या पोलिसांच्या गुन्हेगारी विश्वाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिस दलातील वास्तव परिस्थिती आणि त्यांच्या विरोधात परखड लिखाण केल्याने दिवसभर नागरिकांनी फोनवरून ‘लोकमत’चे अभिनंदन केले. ‘लोकमत’चे अभिनंदन ‘हे पोलिस आहेत की दरोडेखोर? या पोलिसांच्या गुन्हेगारी विश्वाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्ह्यात खळबळ उडाली. पोलिस दलातील वास्तव परिस्थिती आणि त्यांच्या विरोधात परखड लिखाण केल्याने दिवसभर नागरिकांनी फोनवरून ‘लोकमत’चे अभिनंदन केले. ‘झिरो’ पोलिस हद्दपार शहरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचा कारभार ‘झिरो’ पोलिस सांभाळत आहेत. हे ‘झिरो’ आपल्या हद्दीतील अवैध व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करून अधिकारी व पोलिसांना देत असतात. यासंबंधी शहरातीलच नव्हे, तर जिल्ह्यात ज्या ठिकाणी झिरो पोलिस आहेत, त्यांना हाकलून लावण्याच्या सक्त सूचना ठाणेप्रमुखांना केल्या आहेत, असे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सांगितले.
पोलिसांवर देखरेख ठेवा
By admin | Updated: July 10, 2016 01:40 IST