शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोक्कातील कैद्याचे पोलिसांच्या वाहनातून उडी टाकून पलायन; कोल्हापूर ते चंद्रपूर प्रवासादरम्यान नांदेड जिल्ह्यात थरार 

By उद्धव गोडसे | Updated: April 8, 2024 19:09 IST

कोल्हापूर : सुरक्षेच्या कारणास्तव मोक्क्यातील चार कैद्यांना कळंबा कारागृहातून चंद्रपूर येथील कारागृहात पाठवताना विशाल उर्फ अनिल बाळासाहेब रुपनर (वय ...

कोल्हापूर : सुरक्षेच्या कारणास्तव मोक्क्यातील चार कैद्यांना कळंबा कारागृहातून चंद्रपूर येथील कारागृहात पाठवताना विशाल उर्फ अनिल बाळासाहेब रुपनर (वय २३, रा. खंडेराजुरी, ता. मिरज) या कैद्याने चालत्या वाहनातून उडी टाकून पलायन केले. नांदेड जिल्ह्यातील सोनखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. ८) पहाटे घडलेल्या घटनेनंतर कोल्हापूर आणि नांदेडपोलिसांनी पळालेल्या कैद्याला मडकी कळंबर (जि. नांदेड) येथून चार तासात पुन्हा जेरबंद केले. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या चार कैद्यांना सुरक्षेच्या कारणास्तव चंद्रपूर येथील कारागृहात पाठवले जात होते. रविवारी सकाळी पोलिसांच्या बंदोबस्तात चार कैद्यांसह वाहन चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाले. पहाटे तीनच्या सुमारास नांदेड जिल्ह्यातील सोनखेड हद्दीत वाहनाची गती कमी असल्याचे पाहून कैदी विशाल रुपनर याने वाहनाचे दार उघडून बाहेर उडी मारली. काही क्षणात तो रात्रीच्या अंधारात बाजूच्या शेतात गायब झाला.पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती ११२ क्रमांकावरून नांदेड पोलिसांना दिली. काही वेळातच दाखल झालेले पोलिसांची पथक आणि श्वान पथकाद्वारे कैद्याचा शोध सुरू केला. स्थानिक पोलिस, पोलिस पाटील आणि पोलिस मित्रांच्या मदतीने कैदी रुपनर याला मडकी कळंबर गावाच्या शेतातून ताब्यात घेतले. चार तासांच्या शोध मोहिमेनंतर कैदी सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.

नांदेडचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, उपअधीक्षक सुनीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग माने आणि त्यांच्या पथकाने कैद्याचा शोध घेतला. खराब रस्ता आणि काढलेली बेडीसोनखेड येथे एकेरी आणि खराब रस्ता असल्याने वाहनांची गती कमी असते. कैदी रुपनर याच्या हातात बेडी नव्हती. याचाच फायदा उठवत त्याने पलायन केले. प्रवासादरम्यान कैद्यांना बेडी घालण्यात आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यात कसूर केल्याबद्दल दोषी पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNandedनांदेडPoliceपोलिस