शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर परिक्षेत्रात १०० टोळ्यांवर मोक्का, ६७६ गुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 17:54 IST

परिक्षेत्रातील १०० टोळ्यांना ‘मोक्का’ लावून ६७६ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर परिक्षेत्रात १०० टोळ्यांवर मोक्का, ६७६ गुन्हेगारांना अटकविशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची माहिती

कोल्हापूर : परिक्षेत्रात कोल्हापूर, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, सोलापूर ग्रामीण हे विकसनशील जिल्हे येतात. वाढते औद्योगीकरण, बांधकाम क्षेत्र, जमिनींचा वाढता भाव यांमुळे विकासाबरोबरच वर्चस्ववादामुळे संघटित गुन्हेगारीमध्ये होणारी वाढ थोपविणे भविष्यातील सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याने खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, सावकारीसारखे गंभीर व सामाजिक गुन्हे करणाऱ्या टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी परिक्षेत्रातील १०० टोळ्यांना ‘मोक्का’ लावून ६७६ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.परिक्षेत्रात गुन्ह्यांची संख्या वाढते आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची तक्रार घेऊन गुन्हे दाखल केले जात आहेत. कोणत्याही गुन्ह्यामध्ये तक्रार टाळाटाळ किंवा परस्पर मिटविण्याचा प्रयत्न करू नका, अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गुन्ह्यांची संख्या वाढती असली तरी त्यांचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुन्हे कमी करण्यासाठी संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बीमोड करण्यासाठी परिक्षेत्रातून १३२ सराईत गुन्हेगारी टोळ्यांतील ८३० गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे. तसेच कलम ५७ नुसार परिक्षेत्रातील ५४ गुन्हेगारांवर न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झाली आहे. त्यांना हद्दपार करण्यात आले आहे.

न्यायालयीन कामकाजावेळी जे आरोपी हजर राहत नाहीत, अशा ४३३ आरोपींना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे. दरोडे, चोरी गुन्ह्यातील ४४ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ‘निर्भया’ पथकाद्वारे परिक्षेत्रात ६७ हजार २३९ कारवाया केल्या असून ११९ गुन्हे दाखल केले आहेत. सुमारे ६५ हजार ४१० तरुणांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

२१२ फरार व १४८४ पाहिजे असलेल्या आरोपींना पकडण्यात आले आहे. मटका, जुगारामध्ये ८४६८ खटले दाखल करून १७८९ आरोपींवर कारवाई केली आहे. १५ कोटी २५ लाख १९ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दारूबंदीमध्ये २० हजार ४९३ खटले दाखल करून १७ हजार ६१० आरोपींवर कारवाई केली आहे.

१९ कोटी ६३ लाख १० हजार ५५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. खासगी सावकारीमध्ये २५४ गुन्हे दाखल करून ५८२ आरोपींवर कारवाई केल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.जिल्हावार मोक्का कारवाईकोल्हापूर-२०, सांगली- ८, सातारा-१९, सोलापूर ग्रामीण-१२, पुणे ग्रामीण-४१ 

 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलkolhapurकोल्हापूर