शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
3
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
4
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
5
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
6
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
7
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
8
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
9
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
10
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
11
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
12
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
13
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
14
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
15
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
16
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
17
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
18
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
19
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
20
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींकडून एफसीआयच्याही खासगीकरणाचा डाव : राजू शेट्टी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:30 IST

NarendraModi, Bjp, FarmarStrike, RajuShetti, Kolhapur भारतीय अन्नधान्य महामंडळ (एफसीआय) ही देशाला अन्नधान्य पुरविणारी यंत्रणा मोडीत काढून ती अदानी, अंबानींच्या घशात घालण्याचा मोदी सरकारचा डाव आहे; त्यासाठीच जीवनावश्यक कायद्यासह बाजार समितीच्या अधिनियमांत बदल केला आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला.

ठळक मुद्देमोदींकडून एफसीआयच्याही खासगीकरणाचा डाव : राजू शेट्टी यांचा आरोपकंत्राटी शेती पूर्वीपासूनच; पण किती भले झाले

कोल्हापूर : भारतीय अन्नधान्य महामंडळ (एफसीआय) ही देशाला अन्नधान्य पुरविणारी यंत्रणा मोडीत काढून ती अदानी, अंबानींच्या घशात घालण्याचा मोदी सरकारचा डाव आहे; त्यासाठीच जीवनावश्यक कायद्यासह बाजार समितीच्या अधिनियमांत बदल केला आहे, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे केला.शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांचे भले करण्याच्या नावाखाली मोदींकडून धनदांडग्यांचे हितसंबंध जपले जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात सर्वच उद्योग बंद पडलेले असतानाही शेती सुरू राहिल्याने उद्योगपतींचा डोळा शेतीकडे वळला आहे. त्यांना सोईचे असे कायदेही सरकारने करून देण्यास सुरुवात केली आहे.

जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करण्यापाठोपाठ बाजार समित्यांच्या बाहेर विक्रीसाठी परवानगी देऊन अब्जावधींची उलाढाल असलेल्या समित्यांसमोर बड्या उद्योगपतींच्या कॉर्पोरेट समित्यांचे आव्हान तयार केले आहे. अन्नधान्य महामंडळ या सरकारी यंत्रणेचे देशभर जाळे आहे. त्यांचे गोडावून, पुरवठ्याची साखळी मोठी आहे.

तोटा वाढत असल्याचे दाखवून त्यँचे खासगीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत. एक देश - एक समिती असे म्हणतात; मग एक किंमत का नाही? हा आमचा प्रश्न आहे. सरकारने आधी किमान हमीभाव जाहीर करावा, कंपन्यांवर कारवाईची तरतूद करावी आणि खुशाल कायदे करावेत.फडणवीसांना टोलादेंवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचारावर पुस्तक काढणार असे म्हटले आहे, त्यांनी ते जरुर काढावे, त्यांना माझे समर्थनच आहे; पण सिंचन घोटाळ्यावेळी गाडीभर पुरावे देण्याचा अनुभव त्यांनी विसरू नये, असा टोला शेट्टी यांनी लगावला. स्वत:ची गाडी आधी आणावी, उगीच हवेतील गप्पा मारू नयेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.कडकनाथचा अनुभव..कंत्राटी शेतीचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला आहे. स्वीट कॉर्न, स्ट्रॉबेरी, शेळ्या-मेंढ्या पालन, कडकनाथ कोंबड्यांपर्यंत शेतकऱ्यांनी चांगलाच अनुभव घेतला आहे. महाग दराने बियाणे माथी मारून शेतकऱ्यांना हातोहात फसवून हे कंत्राटदार गायब झाले, त्यांच्यावर कारवाईचे धाडस तरी सरकारने केले का? असा सवालही शेट्टी यांनी केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीFarmer strikeशेतकरी संपBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीkolhapurकोल्हापूर