हुपरी येथील सोनार व्यापारी दत्तात्रय भरमू पुजारी व त्यांचा मुलगा श्रीरंग हे दोघे २५ जानेवारी २०२१ रोजी कारदगा येथील दुकान बंद करून घरी जात होते. दरम्यान, मोटारसायकलीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्याकडील दागिने असलेली पिशवी काढून घेतली. तसेच शिवीगाळ करीत पिस्टलने गोळी झाडून सर्व संशयितांनी पलायन केले. या प्रकरणी सात आरोपी निष्पन्न करण्यात आले होते. यातील मारुती हेरवाडे दोन वर्षांपासून फरार होता. त्याला सापळा रचून शिवनाकवाडी येथून अटक केली. त्याला पुढील तपासासाठी हुपरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रणजित पाटील, बालाजी पाटील, महेश खोत, अमर शिरढोणे, सूरज चव्हाण यांनी केली.
‘मोक्का’तील आरोपीला अटक; दोन वर्षांपासून होता फरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:24 IST