शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अपयश झाकण्यासाठी पुरग्रस्त जिल्ह्यातील मोबाईलचे नेटवर्क, इंटरनेट सेवा बंद : राजू शेटटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 14:14 IST

कोल्हापूर :  दहा दिवसापासून सांगली व कोल्हापूर हे दोन जिल्हे महापुराच्या विळख्यात अडकले आहेत. सरकारची कोणतीही यंत्रणा पुरग्रस्तापर्यंत पोहचली ...

ठळक मुद्देअपयश लपविण्यासाठी मोबईलचे नेटवर्क, इंटरनेट सेवा बंद राजू शेटटी यांची सरकारवर टीका

कोल्हापूर :  दहा दिवसापासून सांगली व कोल्हापूर हे दोन जिल्हे महापुराच्या विळख्यात अडकले आहेत. सरकारची कोणतीही यंत्रणा पुरग्रस्तापर्यंत पोहचली नाही. सर्वसामान्य नागरीक, जनावरे व शेतकर्यांना कोणतीही मदत शासनाकडून झालेली नाही. यामुळे दोन्ही जिल्ह्यातील नागरीकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदतीची याचना लोकांच्याकडे करू लागले व हे सारे अपयश लोकांसमोर आल्याने सरकार हे अपयश झाकण्यासाठी गेल्या दहा दिवसात दोन्ही जिल्ह्यातील मोबाईलचे नेटवर्क व इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, अशी टीका  माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर केली आहे सरकार महापुराचा सामना करण्यासाठी पुर्णत: अकार्यक्षम ठरले आहे. प्रशासनातील अधिकार्यांनी शासनाकडे आपत्ती व्यवस्थापन कार्यक्षम होण्यासाठी यांत्रिकी बोटी, सैन्य दलाच्या बोटी, लाईफ जॅकेट व इतर साहित्यांची मागणी करण्यात आली होती. मात्र शासनाकडून कोणत्याच गोष्टींची दखल घेण्यात आली नाही. जिल्ह्यातील पुर परिस्थिती गंभीर झाली असताना अपुर्या साहित्यासह प्रशासन महापुराचा सामना करत होते.वास्तविक पाहता देशामध्ये डिजीटल इंडियाचा डांगोरा पिटविला जात आहे. मोबाईल कंपन्यांमध्ये ५ जी व ६ जी इंटरनेट सुविधा देण्याची स्पर्धा लागली आहे. मात्र गेली दहा दिवस सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो लोक महापुरात सापडले असताना संपर्काचे महत्वपुर्ण साधन असलेल्या मोबाईलने ऐनवेळेस धोका दिला आहे.

गेल्या दहा दिवसापासून पुरग्रस्त भागात दुरध्वनी सेवा बंद असून इंटरनेटची सुविधाही बंद पडली आहे. अनेक गावातील लोकांच्याकडे तालुक्यांतील तहसीलदार, गटविकास अधिकारी किंवा संबंधित प्रमुख अधिकार्यांचे संपर्क नंबर नाहीत.

यामुळे पुरग्रस्त भागातील लोकांनी थेट सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. अनेक शासनाच्या अकार्यक्षमतेचे नमुने जनतेसमोर येऊ लागले पण अनेक सामाजिक संस्था व समाजातील नागरीकांनी या लोकांना वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावली.सरकारचा अकार्यक्षमतेचा कारभार जनतेसमोर येऊ लागल्याने सरकारने मोबाईल कंपन्याना हाताशी धरून या सर्व भागातील मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क व इंटरनेट सुविधा बंद पाडली. यामुळे नागरीकांना कोणाचाही संपर्क होत नव्हता व आपल्यासमोरील आपत्ती जगासमोर दाखविता येत नव्हती. आजही या सर्व कंपन्यांची नेटवर्क व इंटरनेट सुविधा बंद असून सरकारचे अपयश लपविण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरीकांना या गोष्टींचा नाहक त्रास करावा लागत आहे. जर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी या यंत्रणा उपयोगी पडत नसेल तर डिजीटल इंडियाचा थाप पाठीवर मारून घेऊ नये.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर