शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट कारभाराबाबत कोल्हापुरात मनसेचे आंदोलन, १५ फुटी महाभस्मासुराच्या दहनाचा प्रयत्न

By संदीप आडनाईक | Updated: August 22, 2023 18:33 IST

४६ पानांचे निवेदन आणि १०० भ्रष्टाचाराचे लेखी पुरावे देण्यात आले

कोल्हापूर : रस्त्यांच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता, उपअभियंत्यांना काळ्या यादीत टाका, रस्ता घोटाळ्याचे भ्रष्ट सूत्रधार बडतर्फ करून त्यांच्यावर चार दिवसांत फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी बांधकाम विभागाच्या आवारात निदर्शने केली. पितळी गणपती परिसरात आंदोलन करण्यात येणार असल्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला. जमावबंदीमुळे १५ फुटी महाभस्मासुराचे दहन करण्यास परवानगी नाकारल्यामुळे कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत वादावादी झाली.रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल आणि भ्रष्ट कारभाराबद्दल मनसेने हे आंदोलन केले. कोल्हापुरात गेल्या दहा वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांसाठी दोनशे कोटी रुपये खर्च केले; परंतु रस्ते खराबच राहिले. महापुराच्या काळात खराब रस्त्यांसाठी केंद्राकडून पाच आणि राज्य सरकारकडून पाच कोटीचा निधी मिळाला; परंतु क्राँकिटीकरण करण्याऐवजी डांबरीकरण करून ठेकेदाराशी संगनमत करून पैसे लाटल्याचा आरोप मनसेचे शहर अध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी केला. ४६ पानांचे निवेदन आणि १०० भ्रष्टाचाराचे लेखी पुरावे देण्यात आले. अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील यांच्या स्वीय सहायकांनी निवेदन स्वीकारले. या आंदोलनात प्रसाद पाटील, नितेश आजगेकर, उत्तम वंदुरे, अरविंद कांबळे, सागर साळोखे, यतीन हुरणे, संजय पाटील, अजिंक्य शिंदे, अभिजित राउत, पूनम पाटील, अमित बंगे आदी सहभागी झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMNSमनसे