शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Gram Panchayat Result: राधानगरीत आबिटकर, सतेज पाटील, अजित पवार, उद्धव ठाकरे गटाची बाजी, काही गावात स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 15:59 IST

गौरव सांगावकर राधानगरी : तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९ ग्रामपंचायतीमध्ये काही गावात नेत्यांनी ...

गौरव सांगावकरराधानगरी : तालुक्यातील १२ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९ ग्रामपंचायतीमध्ये काही गावात नेत्यांनी सत्ता राखली, तर काही ठिकाणी सत्तांतर झाले. यामध्ये आबिटकर गट, सतेज पाटील गट, अजित पवार गट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बाजी मारली. काही गावात स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व दिसून आले. तालुक्यातील लक्षवेधी ठरलेल्या सरवडेमध्ये विरोधी समविचारी आघाडीचा पराभव करीत बिद्रीचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक राजेंद्र पाटील व गोकुळचे संचालक आर.के.मोरे या नेत्यांच्या सताधारी आघाडीचे रणधिर विजयसिंह मोरे हे मोठ्या  मताधिक्याने विजयी झाले. तर फराळे येथे सतेज पाटील गटाच्या सरपंच पदाच्या वैशाली संदीप डवर यांनी बाजी मारली. 

न्यू करंजे राजश्री शाहू आघाडीचे सरपंच सद्दाम शिराज तांबोळी  तर फेजीवडे मध्ये प्रतिभा भरत कासार यांनी सरपंच पदासह सत्ता काबीज केली. बारडवाडीत सत्तांतर करीत आबिटकर गटाचे वसंत पाटील विजयी झाले.  पालकरवाडी अजित पवार गटाचे महेश नामदेवराव भोईटे. चांदेकरवाडीत मनसे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सीमा हिंदुरावा खोत यांनी सत्ता परिवर्तन केले. कसबा वाळवे सरपंच वनिता भरत पाटील. मांगेवाडी प्रवीण नामदेव ढवन, तर पोट निवडणुकीत कोदवडे  दीपाली रामचंद्र वाडकर, म्हासुर्ली ग्रामपंचायत पोटनिवडणूक विरोधी आघाडीचे सदस्य पदाचे उमेदवार अक्षय चौगले विजयी झाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायतResult Dayपरिणाम दिवसradhanagari-acराधानगरी