शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

Kolhapur: मालकाप्रती निष्ठा! पी. एन. पाटील यांच्यानंतर 'ब्रुनो'नेही सोडले प्राण

By पोपट केशव पवार | Updated: May 29, 2024 19:20 IST

कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील यांच्यावर कार्यकर्तेच जिवापाड प्रेम करत होते असे नाही, तर मुक्या प्राण्यांनाही त्यांचा लळा ...

कोल्हापूर : आमदार पी. एन. पाटील यांच्यावर कार्यकर्तेच जिवापाड प्रेम करत होते असे नाही, तर मुक्या प्राण्यांनाही त्यांचा लळा होता. याचेच प्रत्यंतर आमदार पाटील यांच्या निधनानंतर काल, मंगळवारी रात्री आले. पाटील यांच्या निधनानंतर अन्न पाणी सोडलेल्या त्यांच्या 'ब्रूनो' या श्वानानेही दहा दिवसांतच प्राण सोडला. आयुष्यभर एकाच पक्षाची निष्ठा ठेवणाऱ्या पी. एन. यांच्या श्वानानेही आपल्या मालकाप्रति कशी निष्ठा वाहिली याची अनुभूती यानिमित्ताने आली. १९ मे ला आमदार पाटील हे घरीच बाथरूममध्ये कोसळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  अखेर उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

आपला मालक घरी दिसत नसल्याने ब्रूनोही अस्वस्थ झाला. त्याने अन्नपाणी सोडले. त्याची अवस्था पाहून त्याला सलाईन लावण्यात आले. त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. पण दहा दिवसांपासून मालकाचा चेहरा नजरेस पडत नसल्याने ब्रूनो'ने अखेर प्राण सोडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरP. N. Patilपी. एन. पाटीलdogकुत्रा