शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

विरोधकांचे सर्व आरोप दिशाभूल करण्यासाठीच

By admin | Updated: April 11, 2015 00:10 IST

‘गोकुळ’चे रणांगण : डी. व्ही. घाणेकर यांचे प्रत्युत्तर

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या कारभाराबाबत विरोधकांनी केलेले आरोप हे धादांत खोटे व दिशाभूल करणारे आहेत. त्यांनी लेखापरीक्षण अहवालाबाबतची वस्तुस्थिती जाणून घेणे गरजेचे होते. स्पर्धक संघांच्या तुलनेत कारभार करताना प्रत्येक गोष्टीत काटकसर केली असल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ‘गोकुळ’च्या कारभाराबाबत टीका केली होती. त्याला उत्तर देताना घाणेकर म्हणाले, शुद्ध व गुणवत्तापूर्ण दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बल्क कुलर योजना गरजेची आहे. आगामी काळात कॅनविरहित दूध संकलन करण्याचा आमचा मानस आहे. ‘गोकुळ’ व ‘अमूल’ने राबविलेल्या बल्क कुलर योजनेचा अभ्यास केल्यास कोणाची योजना फायदेशीर आहे हे कळेल. दूध पावडरीचा हंगाम बारा महिने नसतो. दुधाचे उत्पादन वाढले त्याची की पावडर करावी लागते. लोणी साठवणुकीसाठी सुमारे दहा कोटींचा खर्च अपेक्षित अहे. गुंतवणुकीचा विचार करता त्यावरील व्याज एक कोटी येईल. त्याशिवाय देखभाल खर्च वेगळा; त्यामुळे गरजेनुसार साठवणूक केली जाते. संघामार्फत मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विविध ठिकाणी वितरकामार्फत दुधाची विक्री केली जाते. मुंबई व पुणे ही केंद्रे कोल्हापूरपासून दूर असल्याने मुंबई येथे संघाने स्वत:चे पॅकेजिंग स्टेशन उभारले असून, पुणे येथे भाड्याने पॅकेजिंग व कोल्ड स्टोअरेज घेतलेले आहे. गायत्री स्टोअरेजबरोबर दरवर्षी करार केला जातो. बाजारातील दराप्रमाणे अथवा त्यापेक्षा कमीच दर त्यांना दिला जातो. त्यामुळे या व्यवहारातून संघाला कोणतीही तोशीस पोहोचत नाही. अल्युमिनियम कॅन ‘खांबेटे कोठारी कॅन्स’ या कंपनीकडूनरीतसर जाहिरात देऊन खरेदी केले होते. १५०० पैकी ८०० कॅन्सचा पुरवठा त्यांनी केला. उर्वरित कॅन्सचा पुरवठा करण्याचे दरम्यान केंद्र शासनाने ५.१५ टक्के एक्साईज ड्यूटी लागू केल्याने वाढीव दराची मागणी झाली. त्यामुळे फेरनिविदा काढाव्या लागल्या. भविष्याचा विचार करून पावडर प्लॅँटचे विस्तारीकरण करण्यात आले. विस्तारीकरणानंतर सुगीच्या काळात सरासरी २३ टन पावडर तयार करता आली. आगामी काळात दूध वाढत असल्याने विस्तारीकरण गरजेचे होते. त्या प्रकल्पाचा खर्चही तुलनेने फारच कमी आहे. २००८ ला दुधाच्या टॅँकरची निविदा काढली होती. त्यानंतर २०१२ ला त्याच दराने करार केले. जुनेच दर कायम ठेवले. महासंघाच्या परिपत्रकापेक्षा एक पैसाही त्यांना जादा दिलेला नाही. दूध पावडर व लोण्याच्या दरात घसरण असल्याने १२५ कोटींची पावडर गोडावूनमध्ये पडून आहे. अशा वेळी बाजारातील परिस्थिती व संघाचे गुंतून पडलेले भांडवल यांवर निर्णय घ्यावे लागतात. यात थोडा दर कमी मिळाला म्हणजे नुकसान म्हणता येणार नाही. कृत्रिम रेतन, आॅटोमॅटिक कलेक्शन मशीन याबाबत केलेले आरोप ताळेबंदाला दिसत नाहीत. यावेळी आमदार महादेवराव महाडिक, अध्यक्ष दिलीप पाटील, अरुण नरके, रणजितसिंह पाटील, आदी उपस्थित होते. पशुखाद्यावर बोनस देणारा पहिला संघसंघाच्या पशुखाद्याची गुणवत्ता असल्याने दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. अत्यंत माफक दरात पशुखाद्य उपलब्ध करून दिले जाते. पशुखाद्याच्या व्यवसायात तूट येत असते. काही मंडळींनी तुटीची बेरीज करून १४५ कोटींचा आकडा गोळा करण्याचा प्रयत्न केला आहे, हे चुकीचे आहे. पशुखाद्याच्या प्रतिकिलोला ५० पैसे बोनस देणारा हा देशातील पहिला दूध संघ असल्याचे घाणेकर यांनी सांगितले. ५वाहनांवरील खर्च योग्यचदूध संघाचा व्याप व १६०० कोटींचा व्यवहार पाहता त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तेवढी यंत्रणा लागतेच. जिल्ह्यातील १२५० गावे, पुणे, मुंबई या पट्ट्यातही संघाचे कामकाज चालते. विविध योजना राबविण्यासाठी पदाधिकाऱ्यांना फिरती करावी लागते. त्यामुळे हा खर्च अनाठायी म्हणता येणार नसल्याचे घाणेकर यांनी सांगितले.