शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात शंभर कोटींच्या रस्ते कामात १८ कोटी ढपल्याचा डाव, ठाकरे शिवसेनेचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 14:29 IST

ठेकेदार निश्चित होत नाही तोपर्यंत प्रशासक नाही

कोल्हापूर : राज्य शासनाच्या नगरोत्थान महाअभियानांतर्गत मंजूर झालेल्या १०० कोटी रस्ते कामाच्या निविदेत शहराच्या २० किलोमीटर परिघातच डांबराचा प्लांट हवा, अशी अट घातली आहे. स्थानिक चार ते पाच ठेकेदारांनाच हे काम मिळावे आणि त्यांच्याकडून १५ ते १८ कोटींचा ढपला पाडावा, असा महापालिका अधिकाऱ्यांचा डाव आहे, असा आरोप ठाकरे गटाच्या शिवसेनेतर्फे गुरुवारी करण्यात आला. जोपर्यंत शंभर कोटी रस्त्याचा ठेकेदार निश्चित होत नाही, तोपर्यंत महापालिकेस कायमस्वरूपी प्रशासक येत नाही, असा गंभीर आरोपही जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला.महापालिकेत अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ आणि शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासोबत शिवसेना पदाधिकाऱ्यांची झालेल्या बैठकीत हा आरोप करण्यात आला. यावेळी शंभर कोटी रस्त्यांच्या निविदेचा फेरविचार करावा, निविदा पुन्हा प्रसिद्ध करावी, अशा मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांना शिष्टमंडळातर्फे देण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, विकासाला नव्हे तर भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे. शहरातील १६ रस्ते करण्यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्या मर्जीतील ठेकेदारांनाच काम मिळावे यासाठी निविदेत २० किलोमीटर अंतरावरच डांबरी प्लांट असावा, अशा जाचक अटी घातल्या आहेत. या अटीमुळे बाहेरच्या कंपन्या निविदेत भाग घेऊ शकत नाहीत. स्पर्धा न झाल्याने चोरांच्या सांगण्यावरून मर्जीतील ठेेकेदारांनाच काम देत त्यांच्याकडून १८ कोटीपर्यंत ढपला पाडण्याचा डाव आहे. यावेळी विशाल देवकुळे, मंजित माने, राहुल माळी, शशिकांत बिडकर, प्रतिज्ञा उत्तुरे, संजय जाधव आदी उपस्थित होते.

मंजूर १६ रस्त्यांतील अनेक रस्ते सुस्थितीत आहेत. ते वगळून शहरातील खराब रस्ते करावेत. निविदेची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवा, अन्यथा यापूर्वी लोक आंदोलन करून रस्ते कामातील ठेकेदार बदलण्यास भाग पाडले होते. असे होऊ नये, असे वाटत असेल तर आताच प्रशासनाने चांगला निर्णय घ्यावा. - विजय देवणे, जिल्हाप्रमुख निविदा ग्लोबल आहे असे सांगता; मग २० किलोमीटरच्या अंतराची अट का? ही अट काढून फेरनिविदा प्रसिद्ध करावी, अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल. - रविकिरण इंगवले, शहर प्रमुख शिष्टमंडळाच्या मागण्यांसंबंधी वरिष्ठांकडे चर्चा केली जाईल. निविदेची प्रक्रिया पारदर्शकच आहे. शासनाच्या आदेशानुसारच ठेकेदाराचा २० किलोमीटरवर प्लांट असावा, अशी अट निविदेत घातली आहे. रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त शंभर कोटीची निविदा शासनाच्या नियम, अटीच्या अधीन राहूनच प्रसिद्ध केली आहे. मंजूर रस्ते चांगले असतील तर ते पुन्हा करण्यात येणार नाही. जितके रस्त्यांचे काम होईल तितक्याचेच बिल देण्यात येणार आहे. - हर्षजित घाटगे, शहर अभियंता  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShiv Senaशिवसेना