शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्या : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 10:46 IST

कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातच

लाेकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : माझ्या वक्तव्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार चेष्टा केली जाते. मात्र, सगळी चेष्टा त्यांच्या अंगलट येणार असून, मी जे म्हणत गेलो तेच होत गेले. जे जात्यात होते त्यांचे पीठ झाले आणि जे सुपात होते ते आता जात्यात जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी बॅगा भरून ठेवाव्यात. आता कोणाचाही नंबर लागू शकतो, असा सूचक इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  पत्रकारांशी बोलताना दिला.

शिवसेना पदाधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी ईडीला सापडलेल्या डायरीमध्ये ‘मातोश्री’ला २ कोटी व ५० लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख असल्याबाबत विचारले असता, चंद्रकांत पाटील म्हणाले, ईडी ही स्वायत्त संस्था आहे. कोणाच्या घरी काय सापडले, त्यात काय आहे हे मला माहिती नाही. मात्र,  खूप काहीतरी होणार आहे, असे दिसते.

नव्या धमकीबद्दल धन्यवाद : संजय राऊत संजय राऊत यांनी माझी केलेली चेष्टा त्यांना महागात पडेल, या चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर राऊत यांनी पलटवार केला आहे. ‘नव्या धमकीबद्दल धन्यवाद. महाग पडेल म्हणजे? ईडी पकडून आणखी एक खोटे कांड करणार. बदनामी मोहीम राबविणार, मुलाबाळांना त्रास देणार. बरोबर? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत जी भाषा तुम्ही वापरता, चेष्टा करता ते सहन करायचे? शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडलीय हा अनुभव आपण घेताय.’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी पाटील यांना सुनावले.

उद्धव ठाकरेंची कुंडली बघायची आहेउद्धव ठाकरे हे भाग्यवान आहेत. त्यांची कुंडली बघायची आहे. कशाचे साेयरसूतक नाही. कोणी त्यांना अडवूच शकत नाही, कारण सगळ्यांची मजबुरी आहे. ठीक आहे, काही जणांचे भाग्य असते, पण प्रश्न तरी सुटले पाहिजेत. ते त्यांच्याकडून होत नसल्यानेच लोक एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याकडे जातात.

राज्य सरकार ठाकरे नव्हे, तर पवारच चालवतातचंद्रकांत पाटील म्हणाले, राज्य सरकार उद्धव ठाकरे नव्हे, तर अजित पवारच चालवतात, ही वस्तुस्थिती आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परवा विधिमंडळात विनंती केली. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक फक्त त्यांच्याकडेच आहे. ते धाडसी आहेत, बाकीचे सगळे भेकड आहेत.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाministerमंत्री