मंत्री मुश्रीफ हे ग्रामविकास मंत्री झाल्यापासून साधारणतः सोमवारी दुपारनंतर मुंबईला जाऊन शुक्रवारी सकाळी कागलमध्ये हजर होतात. सोमवार, दि. १३ रोजी ही ते मुंबईला जाण्यासाठी निघणार होते; पण त्याचदिवशी किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले. त्यास कोल्हापुरातून त्यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनाही उत्तर देण्यासाठी मुंबईला जाणे रद्द करून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आणि मंगळवारी सकाळी ते मुंबईला रवाना झाले. मुंबईत फ्लूने आजारी पडल्याने ते नियमित तपासणी करीत असलेल्या बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये दाखल झाले. यामुळे ते दरवेळीप्रमाणे मागील शुक्रवारी आले नाहीत. इकडे कोल्हापुरात किरीट सोमय्यांचा निषेध करण्यावरून गेल्या सोमवारी मोठा वाद उभा राहिला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता ते शुक्रवारी कागलमध्ये येत आहेत.
मंत्री मुश्रीफ उद्या कागलमध्ये येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST