शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री अशोक चव्हाण म्हणजे कोतवाल बनलेले राजकारणी : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 17:14 IST

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रीपदावरुन कोतवाल बनलेले राजकारणी आहेत, अशी ...

ठळक मुद्देमंत्री अशोक चव्हाण म्हणजे कोतवाल बनलेले राजकारणीआमदार सदाभाऊ खोत यांची टिका: मराठा आरक्षण उपसमितीवरुन हटवावे

कोल्हापूर: सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण हे मुख्यमंत्रीपदावरुन कोतवाल बनलेले राजकारणी आहेत, अशी टिका आमदार सदाभाऊ खोत यांनी शनिवारी कोल्हापुरात केली. चव्हाण यांना कसलेही स्वातंत्र्य नाही, ते आता पोपटासारखे बोलत आहेत, पण त्यांचा पिंजऱ्यातील पोपट झाला आहे, अशीही टिप्पणी केली.आरक्षण मर्यादेवरुन मंत्री चव्हाण यांनी शुक्रवारी हातपाय बांधून तलवार हाती दिली तर लढणार कसे वक्तव्य केले होते. यावर प्रतिक्रिया देताना सदाभाऊ खोत यांनी चव्हाण यांच्यावर टिकेचे बाण सोडताना त्यांना मराठा आरक्षण उपसमितीवरुन हटवावे अशीही मागणी केली. चव्हाण यांच्या रुपाने मुख्यमंत्रीपद भूषवलेला पुन्हा कमी दर्जाच्या खाते सांभाळताना दिसत आहे.

हे म्हणजे तलाठ्याचा कोतवाल झाल्यासारखे आहेत. त्यांची वक्तवे पाहता यांच्यावर आता वेड्याच्या रुग्णालयात जायची वेळ आली आहे. तुम्ही फार हुशार आहात, तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे, दोन वर्ष काय अफूच्या गोळ्या घेऊन काम करत होता का अशी टिप्पणीही केली.खोत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले मराठा आरक्षण करंट्या महाविकास सरकारने रद्द केले. राज्य सरकारने कोर्टात योग्य रित्या बाजू मांडली नाही. विरोधी पक्षांनाही सोबत घेतले नाही. वकीलांना मार्गदर्शन केले नाहीत. गायकवाड समितीतील महत्वाचे पुरावे जोडले नाहीत. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले, पण राज्य सरकार का गेले नाही. यावरुन सरकारमधील मराठा समाजाच्या नेत्यांना आरक्षण द्यायचे नाही हे स्पष्ट होते. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत kolhapurकोल्हापूरSangliसांगली