शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
4
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
5
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
6
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
7
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
8
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
10
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
11
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
12
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
13
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
14
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
15
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
16
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
17
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
18
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
19
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
20
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?

साखरेचा किमान दर ३३०० रुपये, केंद्र सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:17 IST

खुल्या बाजारात साखरेच्या किमान दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आता प्रतिक्विंटल ३१०० ऐवजी ३३०० रुपयांच्या आत साखरेची खरेदी करता येणार नाही. अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला हा दिलासा मानला जात असला तरी वाढीव ह्यएफआरपीह्णमुळे साखरेचा किमान दर ३६०० रुपये करावा, यावर साखर कारखानदार आग्रही आहेत.

ठळक मुद्दे साखरेचा किमान दर ३३०० रुपये, केंद्र सरकारचा निर्णयप्रतिक्विंटल ३६०० रूपयांसाठी साखर कारखानदार आग्रही

कोल्हापूर : खुल्या बाजारात साखरेच्या किमान दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आता प्रतिक्विंटल ३१०० ऐवजी ३३०० रुपयांच्या आत साखरेची खरेदी करता येणार नाही. अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला हा दिलासा मानला जात असला तरी वाढीव ह्यएफआरपीह्णमुळे साखरेचा किमान दर ३६०० रुपये करावा, यावर साखर कारखानदार आग्रही आहेत.आंतराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर कमी आणि देशांतर्गत बाजारपेठेत उठाव नसल्याने गेली दोन वर्षे साखर उद्योगासमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. दोन वर्षांची साखर गोडावूनमध्ये पडून राहिल्याने आर्थिक फटका बसत असून शेतकऱ्यांची एफआरपी देता आलेली नाही; तसेच अनेक कारखाने बंद पडले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकारने साखरेच्या किमान दरात वाढ करावी, या मागणीचा रेटा गेली वर्षभर सुरू आहे.

खुल्या बाजारात साखरेचा किमान दर बारीक साखरेसाठी प्रतिक्विंटल ३४५०, तर मध्यम साखरेसाठी ३६५० रुपये असावा, असे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू होते. याबाबत नितीन आयोगाच्या टास्क फोर्सने प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यावर चर्चा होऊन अखेर शिक्कामोर्तब केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.साखरेच्या दरात प्रतिकिलो पाच ते सहा रुपये वाढ झाली तर सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा फारसा फटका बसत नाही. मात्र क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपये कारखान्यांना मिळाले तर तेवढी तरलता तयार होऊन कारखान्यांना फायदा होऊ शकतो.देशात २२ हजार कोटी एफआरपी थकीतसाखरेचा दर आणि एफआरपी यांचा ताळमेळ न बसल्याने सर्वच राज्यांत उसाची एफआरपी थकीत राहिली आहे. देशातील शेतकऱ्यांची २२ हजार कोटी एफआरपी थकीत आहे. त्यात एकट्या उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे १७ हजार कोटी अडकून पडले आहेत.पगार, महागाई भत्त्यावर साखरेचा दर द्याउसाला देण्यात येणारी एफआरपी, साखर कामगारांचे पगार, महागाई भत्ता यांवर आधारित साखरेचा दर निश्चित करावा, अशी मागणी राज्य साखर संघाने केंद्र सरकारकडे केली आहे.

गेली तीन वर्षे साखर कारखानदारी तोट्यात आहे. बँका नवीन कर्जे देत नसल्याने हा उद्योग चालवायचा कसा? या पेचात आम्ही आहोत. यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे साखरेचा किमान दर प्रतीनुसार ३४५० व ३६५० रुपये करण्याची मागणी केली होती. मात्र केंद्राने ३३०० रुपये दर केला. त्यातून कारखानदारी वाचणार नाही.- जयप्रकाश दांडेगावकर,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर संघ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर