शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवा, नाहीतर युक्रेनला टॉमहॉक मिसाईल देईन"; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा
2
सोने-चांदीच्या भावात बुलेट ट्रेनच्या वेगाने वाढ; महाराष्ट्रातील सराफा व्यापारी म्हणतात, आणखी वाढणार....
3
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
4
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
5
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
6
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
7
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
8
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
9
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
10
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
11
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
12
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
13
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
14
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
15
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
16
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
17
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
18
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
19
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
20
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम

शिवाजी विद्यापीठाची ‘ग्रेस गुण’ नोंदविण्याची पद्धत विद्यार्थ्यांना मारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:38 IST

संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्यावतीने विविध विषयांच्या विद्यार्थ्यांना उच्च द्वितीय श्रेणी (हायर सेकंड क्लास) ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्यावतीने विविध विषयांच्या विद्यार्थ्यांना उच्च द्वितीय श्रेणी (हायर सेकंड क्लास) आणि द्वितीय श्रेणी (सेकंड क्लास) देण्यासाठी ‘डॉलर ०.९१’ अंतर्गत ग्रेस गुण दिले जातात. मात्र, गुणपत्रिकेवर हे ग्रेस गुण नोंदविण्याची पद्धत विद्यार्थ्यांना मारक ठरत आहे. असे गुण मिळालेले विद्यार्थी प्राध्यापक पदासाठीची राज्य आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षा (सेट-नेट) आणि एम. फिल., पीएच.डी. प्रवेशासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) नियमानुसार अपात्र ठरत आहेत. या गुण देण्याच्या पद्धतीचा विद्यार्थ्यांना बसणारा फटका, ही पद्धत बदलण्यासाठी काही विद्यार्थ्यांचे सुरू असलेले प्रयत्न, आदींचा वेध घेणारी मालिका आजपासून...एखादा विद्यार्थी सर्वविषयांमध्ये उत्तीर्ण आहे. मात्र, त्याला हायर सेकंड क्लास, सेकंड क्लासमध्ये जाण्यासाठी आवश्यक असणारे कमीत कमी एक ते जास्तीत जास्त दहा गुण या ‘डॉलर ०.९१’ अंतर्गत ग्रेस गुण म्हणून दिले जातात. या गुणांची सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर त्याची नोंद केली जाते. गेल्यावर्षी युजीसीने एम. फिल., पीएच.डी. प्रवेशासाठी असे गुण ग्राह्य धरण्यात येणार नाही, असा नियम केला आहे. त्याबाबतच्या सूचना देशभरातील विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.श्रेणीमध्ये वाढ झाल्याने संबंधित विद्यार्थी हा सेट अथवा नेट परीक्षा देतो. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र पदव्युत्तर पदवीसाठी ग्रेस गुण मिळाले असल्याने त्याला सेट अथवा नेटमध्ये पात्र ठरल्याचे प्रमाणपत्र मिळत नाही. एम. फिल., पीएच.डी.ला प्रवेशदेखील मिळत नाही. त्यामुळे या गुणांची सवलत मिळालेल्या विद्यार्थी अथवा सेवेत असलेल्या सहायक प्राध्यापकांचे पुढील शिक्षण, करिअर थांबत आहे. मात्र, विद्यापीठ, सेट-नेट परीक्षा घेणारा विभाग आणि युजीसी आपआपल्या नियमांवर ठाम असल्याने या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होत आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यापीठाने याबाबत मार्ग काढण्याची मागणी विद्यार्थ्यांतून होत आहे.विद्यापीठ कॅम्पसमधील आकडेवारी दृष्टिक्षेपातपदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी : १५३५पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी : ३६५३एम. फिल. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी : १९२पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी असलेले विद्यार्थी : ६८९गुणपत्रिकेवर नोंद पद्धतीचा फटकाविद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून श्रेणी वाढविण्यासाठी विद्यापीठाकडून ग्रेस गुणदेण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र, हे गुण दिल्यानंतर त्याची गुणपत्रिकेवर नोंद करण्याच्या पद्धतीचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये अशा पद्धतीनेगुण दिले जातात. मात्र, गुणपत्रिकेवर ग्रेस गुण दिल्याचा स्पष्ट उल्लेख या विद्यापीठांकडून केला जात नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी एम. फिल, पीएच.डी. अथवा सेट-नेट करण्यात अडचण येत नाही.