शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus News: एका 'पॉझिटिव्ह' रुग्णामागे पालिकेला दीड लाख रुपये मिळतात?.. जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 16:00 IST

मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या नावे ही क्लिप फिरत असल्याने ती गांभीर्यानेही घेतली जात आहे; परंतु असा कोणताही निधी दिला जात नसून, हा क्लिपमधील संदेश खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देपाझिटिव्ह रूग्णामागे दीड लाख रूपयांचा मेसेज खोटाअपक्ष आमदारांच्या नावे आलेल्या क्लिपमुळे होता संभ्रम

समीर देशपांडेकोल्हापूर : केंद्र सरकारकडून प्रत्येक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामागे महापालिका, नगरपालिकेला दीड लाख रुपये मिळत असल्यामुळे हा सगळा धंदा सुरू झाला आहे, अशी ऑडिओ क्लिप सध्या प्रसारित होत आहे. मीरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या नावे ही क्लिप फिरत असल्याने ती गांभीर्यानेही घेतली जात आहे; परंतु असा कोणताही निधी दिला जात नसून, हा क्लिपमधील संदेश खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.गेले दोन दिवस आमदार जैन यांची ही ऑडिओ क्लिप वेगाने प्रसारित झाली आहे. केंद्र सरकार प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णामागे दीड लाख रुपये देत असल्याने खासगी लॅबना हाताशी धरून अहवाल पॉझिटिव्ह आणले जात आहेत. एकदा का दीड लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली की मग तुमचा आजार बरा झाला म्हणून तुम्हांला घरी पाठवले जाते.

हा सगळा धंदा सुरू आहे. त्यामुळे डॉक्टरकडे जाऊ नका. घरातच काढा घ्या, गरम पाणी प्या. व्हिटॅमिन सीच्या गोळ्या घ्या, असा सल्ला या क्लिपमधून देण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर जबाबदारी ढकलत असून सर्वसामान्यांच्या जिवाचे कुणाला काही पडलेले नाही. जो तो एकमेकाचे पाय ओढण्याच्या नादात आहे. असे न करता एकमेकांना सहकार्य करा, असे आवाहनही या क्लिपमधून करण्यात आले.या क्लिपबाबत लोकमतकडे विचारणा झाल्यानंतर खरोखरच असा निधी मिळतो का, याची माहिती घेतली असता, तसा कोणताही निधी मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य शासनाचा आरोग्य विभाग यामार्फत जो निधी दिला जातो तो उपचारांसाठीची उपकरणे, औषधे यांसाठी दिला जातो. कोणत्याही शासकीय रुग्णालयामध्ये पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार करताना पैसे घेतले जात नाहीत.

महात्मा फुले योजनेमध्ये जी खासगी आणि विश्वस्त रुग्णालये आहेत, ती मात्र रुग्णाच्या नावावर फुले योजनेतून प्रस्ताव दाखल करून बिलाची रक्कम भागवून घेत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.खासगी रुग्णालयांचे पॅकेजशासकीय रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत असताना काही मान्यवर आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याने आता बहुतांश खासगी रुग्णालयांनी आपली पॅकेजीस जाहीर केली आहेत.

प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल करून उपचार केल्यास काही लाखांमध्ये बिलाची रक्कम असून घरी किंवा हॉटेलवरही उपचार देण्याची विविध पॅकेजीस जाहीर करण्यात आली असून, त्यांचे व्हॉटस‌्ॲप संदेशही पाठवले जात आहेत. शासकीय रुग्णालयातही जागेची कमतरता आणि तेथे जाण्यापेक्षा खासगी रुग्णालयात गेलेले बरे, अशी पैसे भरण्याची क्षमता किंवा वैद्यकीय विमा असलेल्या नागरिकांची मानसिकता आहे.आमदारांचा संपर्क होईनाआमदार गीता जैन यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र पहिल्यांदा त्यांचा फोन एंगेज आला आणि नंतर कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असा निरोप येऊ लागला. त्यामुळे याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट झाली नाही. 

अशा पद्धतीने एका रुग्णामागे कोणतेही दीड लाख रुपये वगैरे महापालिका, नगरपालिकांना मिळत नाहीत. रुग्णांसाठी मूलभूत आरोग्य सुविधा आणि सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासन या संस्थांना निधी पुरवठा करीत आहे. जिल्हा नियोजनमधून यंत्रणा उभारण्यासाठी निधी दिला जात आहे. महात्मा फुले योजना किंवा वैयक्तिक वैद्यकीय विम्याच्या आधारे कुणी क्लेम करीत असतील; परंतु अशा पद्धतीने सरसकट रुग्णामागे कोणताही निधी दिला जात नाही.- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टीआयुक्त, कोल्हापूर महापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस