शहरं
Join us  
Trending Stories
1
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
2
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
3
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
4
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
5
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
6
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
7
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
8
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
9
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
10
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
11
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
12
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
13
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
14
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
15
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
16
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
17
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
18
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
19
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
20
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली

लिंगनूरच्या जवानास साश्रुनयनांनी निरोप

By admin | Updated: January 10, 2015 00:50 IST

हजारोंची उपस्थिती : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

गडहिंग्लज : लिंगनूर, कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे ‘अमर रहे..अमर रहे..सुनील जोशीलकर अमर रहे..!’च्या घोषात हजारो अबालवृद्धांच्या उपस्थितीत आपल्या लाडक्या सुपुत्राला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. गावाच्या बेघर वसाहतीजवळील माळावर शासकीय इतमामात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चुलतभाऊ अमोलने भडाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.सुनील यांचा जम्मू-काश्मीर येथील डिगडोल येथे सेवा बजावत असताना अंगावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत बुधवार (दि. ७) रोजी मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव आज दुपारी तीनच्या सुमारास गावात आणण्यात आले. दरम्यान, गडहिंग्लजमधील विविध शाळांतील मुलांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून श्रद्धांजली वाहिली.गावच्या वेशीपासून ते घरापर्यंत फुलांनी सजविलेल्या मोटारीतून पार्थिव आणण्यात आले. पार्थिव घराजवळ येताच नातेवाईकांना केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. नातेवाईकांनी पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीतून पार्थिवाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. सैन्यदलासह एन.सी.सी.च्या मुलांनीही यावेळी संचलन केले. (वार्ताहर)मान्यवरांकडून पुष्पचक्र अर्पणपालकमंत्री व सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर, जिल्हा पोलीसप्रमुख मनोजकुमार शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, तहसीलदार हनुमंतराव पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अमरसिंह जाधव, कार्यकारी अभियंता (बांधकाम) जी. टी. पोवार, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, पं. स. सभापती अनुसया सुतार, सरपंच काशीनाथ कांबळे, आदींसह सैन्यदलातील कर्नल रॉक, सुभेदार बाबू नाईक, सुभेदार कोडेकर, कर्नल अ‍ॅलेक्स मोहन, आदींनी श्रद्धांजली वाहिली.नियतीचा कू्रर खेळ अन् योगायोगसुनीलची गर्भवती पत्नी संध्या हिला शुक्रवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास ‘मुलगा’ झाला. सलोनी व सई या दोन मुलीनंतर जन्मलेल्या आपल्या मुलाला पाहण्याची संधी सुनीलला मिळाली नाही. मात्र, पार्थिव आलेल्या दिवशीच सकाळी त्याला मुलगा झाल्याने मुलग्याच्या रूपाने सुनीलचा पुनर्जन्म झाल्याची चर्चा गावकरी व घटनास्थळी होती.‘सुनील’ हे कोल्हापूरचे भूषणदेशसेवेसाठी प्राणाची आहुती देणारे जवान सुनील हे कोल्हापूरचे भूषण आहे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून शासन सुनीलच्या कुटुंबीयांमागे राहील, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.लग्नाचा वाढदिवस राहिला अधुरा२७ जानेवारी २००४ मध्ये सुनील व संध्या यांचा विवाह झाला होता. मात्र, काळाने सुनीलला हिरावून नेल्याने त्यांच्या लग्नाचा १५वा वाढदिवस अर्धवटच राहिला.माता-पिता भाग्यवानदेशासाठी धारातीर्थी पडणारा सुपुत्र देणारे माता-पिता भाग्यवान आहेत, अशा शब्दांत आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी श्रद्धांजली वाहिली.डिजीटल फलक..अन् हंबरडा..!ग्रामस्थांनी केवळ सुनीलचा किरकोळ अपघात झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली होती. मात्र, आज पहाटे घराबाहेर लावलेल्या मुलाच्या श्रद्धांजलीचे डिजीटल फलक पाहून वडील शंकर यांना धक्का बसला अन् हंबरडा फोडला.आरोग्य विभागाची सेवासुनीलची पत्नी संध्या यांना तिसऱ्या दिवशी दुपारपर्यंत पतीच्या मृत्यूची बातमी कळू दिली नव्हती. गावामध्ये पार्थिव आल्यानंतर त्यांना रुग्णालयात या घटनेची माहिती दिली. आरोग्य विभागाच्या खास रुग्णवाहिकेतून त्यांना अंत्यविधीच्या ठिकाणी आणण्यात आले. आक्रोश पाहून उपस्थितांची मने हळहळली.