शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा पारा वाढतोय, ३८ डिग्रीपर्यंत तापमान : सकाळी मात्र थंड हवा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:42 IST

गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात हळू-हळू वाढ होऊ लागली आहे. दिवसभरात ३८ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचले असून गतआठवड्यापेक्षा ७ ते ८ डिग्रीने तापमानात वाढ झाली आहे. सकाळी दहानंतर तापमान वाढत जात असले तरी सकाळी मात्र अजून थोडीशी थंड हवा आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरचा पारा वाढतोय३८ डिग्रीपर्यंत तापमान सकाळी मात्र थंड हवा कायम

कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात हळू-हळू वाढ होऊ लागली आहे. दिवसभरात ३८ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचले असून गतआठवड्यापेक्षा ७ ते ८ डिग्रीने तापमानात वाढ झाली आहे. सकाळी दहानंतर तापमान वाढत जात असले तरी सकाळी मात्र अजून थोडीशी थंड हवा आहे.यंदा पावसाबरोबरच थंडीचा कडाकाही अनुभवयास मिळाला. साहजिकच तीव्र उन्हाळ्याचा अनुभवही येणार हे निश्चित आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमानात वाढ होत गेली. गेल्या आठवड्यात साधारणपणे जिल्ह्याचे किमान तापमान २० तर कमाल ३१ डिग्रीपर्यंत होते. त्यात हळूहळू वाढ होत असून सोमवारी ते ३८ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे.

अजूनही पहाटे गार वारे वाहत असल्याने थंडी वाजते पण सुर्यनारायण जसा वर येत राहतो, तसे तापमान वाढत जाते. सकाळी दहा वाजल्यापासून तर अंग भाजण्यास सुरुवात होते. सूर्य डोक्यावर आल्यानंतर तर घराबाहेर पडणे नको वाटते. हा पारा दुपारी दोनपर्यंत कायम राहतो. त्यानंतर वातावरणात हळूहळू बदल होऊन तापमान कमी होते, रात्री आठनंतर मात्र गार वारे वाहते.आपल्याकडे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून पारा चढत राहतो, पण यंदा फेब्रुवारीतच अंग भाजून निघत आहे. गेल्यावर्षी २६ फेब्रुवारीला किमान २१ तर कमाल ३२ डिग्रीपर्यंत तापमान होते. गेल्यावर्षीपेक्षा ६ डिग्रीने तापमानात वाढ झाली आहे.

गेल्यावर्षी दि. २० ते २८ फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान सरासरी ३३ डिग्रीपर्यंत राहिले. त्याच कालावधीत यावर्षी ३७ डिग्रीपर्यंत तापमान राहिले आहे. आगामी आठ दिवसांचा तापमानाचा अंदाज पाहिला तर कमाल तापमान ३८ डिग्रीवर राहील पण किमान तापमानात वाढ होणार असल्याने उष्मा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

शेतातील कामावर परिणामसध्या ऊसतोडणीसह पिकांच्या भांगलणीचे काम सुरू आहे. उष्मा वाढला की या कामावर परिणाम होत आहे. ऊसतोडणी मजुरांना त्याचा फटका जास्त बसत असून सकाळी अकराच्या पुढे ऊस तोडणे मुश्कील होते.

तुलनात्मक तापमान असे-फेब्रुवारी                   २०१७दिनांक               किमान               कमाल२४ फेब्रुवारी                   २१               ३५२५  फेब्रुवारी                  २१              ३४२६ फेब्रुवारी                   २०              ३२२७ फेब्रुवारी                   २०              ३३२८ फेब्रुवारी                   २३             ३५

फेबुवारी २०१८दिनांक                   किमान        कमाल

२४ फेब्रुवारी                   २२           ३५२५ फेब्रुवारी                   २२           ३६२६ फेब्रुवारी                   १९          ३८२७ फेब्रुवारी                   २१         ३८२८ फेब्रुवारी                   २१         ३८

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTemperatureतापमान