शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मरळीच्या मुलाचा खून पैशाच्या वादातून: विश्वास लोहारची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:55 IST

कोल्हापूर : मरळी (ता. पन्हाळा) येथील प्रदीप सरदार सुतार (वय ९) या शाळकरी मुलाचा खून आर्थिक व्यवहारातून केल्याची कबुली

ठळक मुद्दे३१ हजारांसाठी लावला होता तगादाघटनास्थळावरील काही दृश्ये संशयास्पद रंकाळा परिसरात फिरवत रात्री आठच्या सुमारास खणीत ढकलून दिले.

कोल्हापूर : मरळी (ता. पन्हाळा) येथील प्रदीप सरदार सुतार (वय ९) या शाळकरी मुलाचा खून आर्थिक व्यवहारातून केल्याची कबुली संशयित आरोपी पप्पू ऊर्फ विश्वास बंडू लोहार (२३, रा. तिसंगी, ता. गगनबावडा) याने दिली; परंतु घटनास्थळावरून व आरोपीच्या चौकशीतून प्रदीपचे लैंगिक शोषण झाल्याचेही तपासात पुढे आले आहे.

त्यानुसार संशयिताची वैद्यकीय तपासणी करून डीएनए चाचणीसाठी काही नमुने मुंबईच्या फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती सोमवारी वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.

संशयित विश्वास लोहार याने चौकशीत सांगितले, की सरदार सुतार माझा मावसभाऊ आहे. त्याने माझ्या वडिलांना घरबांधणीसाठी ४६ हजार रुपये दिले होते. त्यातील १५ हजार रुपये परत केले. उर्वरित ३१ हजार रुपयांची तो वारंवार मागणी करीत होता. आमचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. सरदार सुतार याने चार लोकांसमोर वडिलांकडे व माझ्याकडे पैसे मागून अपमान केला होता. त्याचा राग माझ्या मनात होता. त्यातूनच आपण त्याचा मुलगा प्रदीप याचा काटा काढण्यासाठी आठवडाभर प्लॅन करीत होतो. रविवारी (दि.५) दुपारी मरळी येथून प्रदीपला कोल्हापूरला घेऊन आलो. त्याला रंकाळा परिसरात फिरवत रात्री आठच्या सुमारास खणीत ढकलून दिले. तेथून मरळीचे लोक मला मारतील, या] भीतीने टिंबर मार्केट येथील बहिणीच्या तानाजी सुतार यांच्या घरी गेलो होतो, अशी कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले.

दरम्यान, संशयित लोहार हा पहिल्यापासून चौकशीमध्ये विसंगत माहिती देऊन तपासाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या विकृत वर्तनावरून तो प्रदीपचे लैंगिक शोषण करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे. यापूर्वीही त्याने मारण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता आहे. घटनास्थळावरील काही दृश्ये संशयास्पद असल्याने संशयिताचे व मृतदेहाचे काही नमुने घेऊन ते मुंबईला पाठविले आहेत. हा रिपोर्ट आल्यानंतर नेमके कारण स्पष्ठ होईल.आठवडाभर आधीपासून तयारीसरदार सुतार याने चार लोकांसमोर विश्वासच्या वडिलांकडे व त्याच्याकडे पैसे मागून अपमान केला होता. त्याचा राग विश्वासच्या मनात होता. त्यातूनच सरदार यांचा मुलगा प्रदीप याचा काटा काढण्यासाठी आठवडाभर प्लॅन केला होता, असे त्यांने सांगितले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस