शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या व्यवहारात मुंबईतील व्यापाऱ्याला तीन लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 14:04 IST

कोल्हापूर : कंदलगाव येथील बोगस सह्याद्वारे बिगरशेती परवाना करुन मुंबईतील व्यापाऱ्याच्या तीन गुंठे रिकामा प्लॉटची परस्पर विक्री करुन तीन ...

ठळक मुद्दे कंदलगावच्या सरपंच, ग्रामसेवकासह दहा जणांवर गुन्हातत्कालीन करवीरच्या तहसिलदारावरही शाहुपूरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा

कोल्हापूर : कंदलगाव येथील बोगस सह्याद्वारे बिगरशेती परवाना करुन मुंबईतील व्यापाऱ्याच्या तीन गुंठे रिकामा प्लॉटची परस्पर विक्री करुन तीन लाख रुपयांना गंडा घातलेप्रकरणी तत्कालीन करवीर तहसिलदार, तत्कालीन कंदलगाव सरपंच, ग्रामसेवक यांचेसह दहा जणांवर शाहुपूरी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा गुरुवारी दाखल करण्यात आला.संशयित समित जयसिंगराव नागेशकर, जितेंद्र चंद्रकांत शिरोडकर, मयुरेश गोविंदराव नागेशकर, गायत्री गोविंदराव नागेशकर, विरेंद्र चंद्रकांत शिरोडकर, सोनल गोविंदराव नागेशकर, वृंदा उर्फ वृषाली माधवराव नाईक (सर्व रा. कोल्हापूर), तत्कालीन करवीर तहसिलदार, कंदलगाव सरपंच, ग्रामसेवक यांचा समावेश आहे.अधिक माहिती अशी, कंदलगाव येथे १२६ गुंठे जमिन आहे. संशयित समित नागेशकर व जितेंद्र शिरोडकर यांनी बोगस सह्याद्वारे बिगरशेती परवाना तयार केला आहे. त्यातील भूषण गोविंद कलगुटकर (रा. मालाड, पूर्व, मुंबई) यांच्या नावावर असलेली तीन गुंठे जागा १६ एप्रिल २०१४ रोजी तत्कालीन करवीरचे तहसिलदार, कंदलगाव सरपंच, ग्रामसेवक यांना हाताशी धरुन परस्पर विक्री केली.

हा व्यवहार कसबा बावडा येथील दस्तनोंदणी निबंधक कार्यालयात झाला. कलगुटकर यांच्या हा प्रकार लक्षात आलेनंतर त्यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर