शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

कोल्हापूरकरांनी जागवल्या सुंदरलाल बहुगुणा यांच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 19:43 IST

environment Kolhapur : चिपको आंदोलनाचे प्रणेते, वृक्षमित्र, ज्येष्ठ पर्यावरणवादी पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाचे वृत्त कळताच कोल्हापूरातील पर्यावरणप्रेमी आणि पत्रकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

ठळक मुद्देकोल्हापूरकरांनी जागवल्या सुंदरलाल बहुगुणा यांच्या आठवणीपर्यावरणप्रेमी आणि पत्रकारांनी दिला आठवणींना उजाळा

कोल्हापूर : चिपको आंदोलनाचे प्रणेते, वृक्षमित्र, ज्येष्ठ पर्यावरणवादी पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाचे वृत्त कळताच कोल्हापूरातीलपर्यावरणप्रेमी आणि पत्रकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.सुंदरलाल बहुगुणा ऑगस्ट २००० मध्ये तीन दिवस कोल्हापूरात होते. ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, पत्रकारितेचे विद्यार्थी असताना त्यांची भेट घेणारे राजेंद्र भस्मे, चित्रकलेच्या माध्यमातून संपर्क साधणारे चित्रकार विजय टिपुगडे आणि ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी बहुगुणा यांच्या आठवणी लोकमतशी बोलताना सांगितल्या.कोल्हापूरात ऑगस्ट २००० मध्ये एका कार्यक्रमासाठी आलेल्या सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन आणि कोल्हापूरातील पर्यावरण चळवळीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. स्टेशन रोडसमोरील एका माडीच्या घरात त्यांची भेट झाल्याची आठवण ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांनी सांगितली. सत्काराच्या निमित्ताने पुष्पहार न घालता फळांचा हार घालावा, अशी सूचना त्यांनी दिल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.्ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र भस्मे यांनीही बहुगुणा यांच्या भेटीची आठवण सांगितली आहे. शिवाजी विद्यापीठात १९८९- ९० मध्ये बीजेसीच्या तुकडीने मार्च महिन्यात दिल्लीत एक अभ्यास दौरा आयोजित केला होता, त्यावेळी उपपंतप्रधान देविलाल होते. या दौऱ्यादरम्यान १६ मार्च १९९० रोजी एका सायंकाळी पीटीआयच्या कार्यालयात कर्मधर्मसंयोगाने चिपको आंदोलनाचे नेते सुंदरलाल बहुगुणा यांची भेट झाली होती. त्यावेळी ॲड्रेस बुकमध्ये त्यांनी सही करुन आपली लेखणी मूक निसर्ग आणि मानवाला वाणी देणारी ठरो, असा संदेश दिला होता.कोल्हापूरात २००० मध्ये एका प्रदर्शनात ज्येष्ठ चित्रकार विजय टिपुगडे यांनी काढलेल्या चित्राचे त्यांनी कौतुक केले होते. त्याच्या आठवणी टिपुगडे यांनी सांगितल्या आहेत. कोल्हापूरात २००० मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बहुगुणा यांच्या हस्ते झालेल्या सत्काराची आठवण ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर यांनी सांगितली.

यावेळी बाचुळकर यांनी जमा केलेल्या २८० औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन बहुगुणा यांनी केले होते. खाणकाम विरोधी आंदोलनामुळे बाचुळकर यांचे त्यांनी कौतुक करुन स्वहस्ताक्षरातील एक कविता भेट दिल्याचे बाचुळकर यांनी सांगितले. केवळ संशोधन न करता प्रत्यक्ष चळवळीत काम करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी शिक्षकांना केले होते.

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर